मोठी बातमी! बीडमध्ये अजित पवार यांच्या ताफ्याचा अपघात, चारजण जखमी

या अपघातात चौघेजण जखमी झालेत. त्यांना धारूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अजित पवार आज बीड दौऱ्यावर होते.

News Photo   2025 11 22T170041.148

News Photo 2025 11 22T170041.148

बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बीडमधील धारूर मार्गे केजकडे जात असताना धूनकवड फाटा परिसरात हा अपघात झाला. (Accident) या अपघातात चौघेजण जखमी झालेत. त्यांना धारूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जमखींपैकी एकाची एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षात अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षानं ठरवलेल्या स्टार प्रचाराकांना विरोध होतोय. बीडमधील आमदार धनंजय मुंडेंनी प्रचारक म्हणून विरोध होऊ लागलाय. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश साळुंखे यांनी धनंजय मुंडेंना आपल्या भागात प्रचार करू नये, असं सांगितलं आहे.

बीडमधील धक्कादायक घोटाळा! भूसंपादनात २४१ कोटींचा घोळ, दहा जणांविरोधात गुन्हा

आपल्या भागात प्रचारासाठी त्यांनी येऊ नये, असं आमदार साळुंखे म्हणालेत. त्याबाबत त्यांनी पक्षश्रेष्ठींना कळवलंय. देवदर्शनाला जाताना काळाचा घाला, सोलापूरमध्ये ५ जणांचा मृत्यू सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील धाराशिव येथे शनिवारी भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी सकाळी ही क्रुझर गाडी सोलापूर-हैदराबाद महामार्गावरुन जात होती.

या गाडीतील प्रवासी सोलापूरवरुन नळदुर्ग येथे देवदर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी धाराशिवमधील अणदूर परिसरात जीप आली असताना वाहनाचे टायर्स फुटले. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे जीप एका ट्रॅक्टरला धडकून रस्त्यावर पलटी झाली.

Exit mobile version