Download App

महाराष्ट्र सदनात घडलेल्या घटनेवर अजित पवार म्हणाले, ‘या घटना जाणूनबुजून….’

Ajit Pawar’s reaction on the incident in Maharashtra Sadan, : दिल्लीतील महाराष्ट्र सदनात (Maharashtra House) काल प्रथमच स्वातंत्र्यसेनानी सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. मात्र या जयंती सोहळ्यादरम्यान, महाराष्ट्र सदनाच्या मध्यभागी असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule), पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांचे पुतळे त्यांच्या मूळ जागेवरून हटवण्यात आले. यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले. हे दृष्कृत्य अतिशय दुर्दैवी अससल्याचं सांगत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला. तर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली.

पुण्यात माध्यमांशी संवाद साधतांना अजित पवार म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यापासून राज्यपाल, सरकारमधील मंत्री या सर्वांनीच महापुरुषांचा अवमान करण्याचे काम केले आहे. त्याला आम्ही कायम विरोध केले. जेव्हा जेव्हा महापुरूषांविषयी बेताल आणि आक्षेपार्ह वक्तव्ये केली, तेव्हा तेव्हा सरकारला जाब विचारण्याचं काम आम्ही केलं. यावेळी तर त्यांनी कहरच केला. काल महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करतांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचा अर्धपुतळा तिथून काढण्यात आला. ते पुतळे काढण्यांच काही कारण नव्हतं, असं पवार म्हणाले.

ते म्हणाले, या अशा घटना घडता कामा नये. मला प्रश्न पडतो की, या घटना जाणूनबुजून केल्या जात आहेत का? की नजर चुकीने घटले? मी त्या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि राज्यातील जनता या घटनेची नक्कीच दखल घेईल, असं अजित पवार म्हणाले.

आव्हाडांनी सांगितला शरद पवारांसमोरचं राष्ट्रवादीचा व्हीप, दादा समर्थकांनी घातला गोंधळ

राज्यातील अनेक मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आला. तोकडे कपडे किंवा अंगप्रदर्शन करणारे कपडे घालणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाकारला जाईल, असा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतला. याविषयी विचारले असता, ते म्हणाले की, मंदिरात भारतीय पेहेराव घालून जायला काही अडचण नाही. काही लोक उत्साहाच्या भरात संविधानाने दिलेले अधिकार विसरुन गेले आहेत, असं त्यांनी सांगितलं.

काल दिल्लाीत आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू आणि पोलिसांत वाद झाले. यावरही अजित पवारांनी भाष्य केलं. ते म्हणाले, ध चा मा केला जातोय. त्या खेळाडू आहेत, त्यांना राजकारण करायचं नाही. मला वाटलं होतं, क्रीडामंत्री हा विषय मार्गी लावतील. पण तसं झालं नाही, असं ते म्हणाले.

 

Tags

follow us