अजित पवारांचे चिरंजीव निवडणुकीच्या रिंगणात? जय पवार बारामती नगरपरिषदेत आजमावणार नशीब

Jay Pawar निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ते बारामती नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असू शकतात.

Jay Pawar

Jay Pawar

Ajit Pawar’s son Jay Pawar to try his luck in Baramati Municipal Council election : राज्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सर्वच पक्षांकडून जयत तयारी सुरू आहे. यामध्येच आज निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. ज्यामध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. या दरम्यानच एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे अजित पवारांच्या चिरंजीव जय पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Film Bazaar 2025 साठी मुक्काम पोस्ट देवाचे घर आणि श्री गणेशा या मराठी चित्रपटांची निवड

त्या अगोदर अजित पवार यांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार यांनी देखील निवडणुकीमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता जय पवार देखील बारामती नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असू शकतात. त्यामुळे बारामती नगरपरिषद अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. कारण या नगर परिषदेमध्ये स्वतः शरद पवार यांचं वर्चस्व आहे. याच नगर परिषदेमध्ये जय पवार नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे.

आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा, जितेश शर्मा कर्णधार; 16 नोव्हेंबरला भारत-पाकिस्तान सामना

जय पवार यांच्या बद्दल सांगायचं झालं तर विधानसभेच्या निवडणूक प्रचारामध्ये ते प्रचंड ऍक्टिव्ह होते. फ्रंट फूट राहून प्रचार करत होते. त्यानंतर आता ते स्वतः निवडणूक लढण्याची शक्यता आहे. जय पवार हे आगामी काळात विधानसभा निवडणुकीचे देखील उमेदवार असू शकतात. त्यामुळे त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची ही तयारी असल्याचे बोलले जात आहे.

राज्य निवडणूक आयोगाची आज 4 वाजता पत्रकार परिषद; निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार?

त्यामुळे दुसरीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची पक्ष बांधणी बारामती मध्ये युगेंद्र पवार यांच्याकडून केली जात आहे त्यामुळे त्यांच्याकडून कोणता उमेदवार समोर येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण अजित पवारांनी बंड केल्यानंतर ज्या काही लोकसभा, विधानसभा आणि इतर निवडणुका झाल्या त्या सर्व पवार विरूद्ध पवार आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत.

Exit mobile version