माझ्या सासुरवाडीचं फार प्रेम उतू चाललंय, पण सध्या आमच्याकडे मॅजिक फिगर नाहीये, असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत आमच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चुकीची अपेक्षा मनात ठेऊन असे बॅनर लावले आहेत. पण मुख्यमंत्री होण्यासाठी 145 ची मॅजिक फिगर संबंधित नेत्याकडे असावी लागते. त्याचवेळी तो नेता मुख्यमंत्री होतो. माझ्या माझ्या सासुरवाडीचं फार प्रेम उतू चाललंय, पण सध्या आमच्याकडे मॅजिक फिगर नसल्याचं अजित पवारांनी स्मित हास्य देत स्पष्ट केलंय.
मागील काही दिवसांपासून अजित पवारच भावी मुख्यमंत्री असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती. एवढंच नव्हे तर अजित पवारांच्या सासुरवाडीत त्यांचे बॅनरही झळकले होते. त्यावरुन आज कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. उस्माबादेतल्या धाराशिवमधील तेरमधील चौकाचौकात अजित पवारांचे बॅनर झळकल्याचं पाहायला मिळालं. बॅनरवर ‘वचनाचा पक्का, हुकमाचा एक्का मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाचं पक्का’ अशी टॅगलाईन देऊन अजित पवारांना भावी मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आलं होतं. तसेच नागुपरातही अजित दादांच्या बॅनरची झलक पाहायला मिळाली होती.
उस्माबादेतल्या धाराशिवमधील तेरमधील चौकाचौकात अजित पवारांचे बॅनर झळकल्याचं पाहायला मिळालं. बॅनरवर ‘वचनाचा पक्का, हुकमाचा एक्का मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाचं पक्का’ अशी टॅगलाईन देऊन अजित पवारांना भावी मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आलं होतं. तसेच नागुपरातही अजित दादांच्या बॅनरची झलक पाहायला मिळाली होती.
Jiah Khan मृत्यू प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सूरज पांचोलीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘सत्याचा नेहमी…’
दरम्यान, पुढील काही दिवसांतच राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून अद्याप सत्तासंघर्षाचा निकाल स्पष्ट करण्यात आलेला नाही, लवकरच या सुनावणीचा निकाल येणार असल्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले 16 आमदार निलंबित झाल्यानंतर सरकार पडणार असल्याचं विरोधकांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रिपद धोक्यात येऊ शकतं असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्याचा भावी मुख्यमंत्री कोण? याबाबत चर्चा रंगलेली असतानाच अजित पवारांचे बॅनर झळकल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी किती फिगर आवश्यक असते त्याची माहिती दिलीय.