Filmfare Award 2023 : अलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ने मारली बाजी, जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी…
Filmfare Award 2023 Winners list : भारतीय चित्रपटसृष्टीतील मानाचा मानला जाणारा मानाचा पुरस्कार म्हणजे फिल्मफेअर पुरस्कार. हा दिमाखदार आणि भव्यदिव्य असा सोहळा नुकताच पार पडला. यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार हा 68 वा पुरस्कार होता. अनेक सेलिब्रेटींनी या सोहळ्यात रेड कार्पेटवर आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ केल्याचं यावेळी पाहायाला मिळालं.
या मानाच्या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली ती अलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाने. या चित्रपटाला तब्बल 10 पुरस्कार मिळाले तर दिग्दर्शक संजय लीला भन्सालींना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला आहे. अलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. तर या सोहळ्यात बधाई दो आणि ब्रम्हास्त्र या चित्रपटांनी देखील आपली छाप सोडली आहे. या दिमाखदार आणि भव्यदिव्य पुरस्कार सोहळ्याचं सुत्रसंचालन अभिनेता सलमान खानने केलं. जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी…
मोनालिसानं पिवळी सोडी नेसून वाढवलं तापमान…
‘फिल्मफेअर पुरस्कार 2023’च्या विजेत्यांची संपूर्ण यादी…
सर्वोत्कृष्ट चित्रपट : गंगूबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : संजय लीला भन्साळी (गंगूबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : राजकुमार राव (बधाई दो)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : अनिल कपूर (जुग जुग जियो)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – शीबा चड्ढा (बधाई दो)
सर्वोत्कृष्ट संवाद : प्रकाश कपाडिया आणि उत्कर्षणी वशिष्ठ (गंगूबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट पटकथा : अक्षय घिल्डियाल, सुमन अधिकारी आणि हर्षवर्धन कुलकर्णी (बधाई दो)
सर्वोत्कृष्ट कथा : अक्षत घिल्डियाल आणि सुमन अधिकारी (बधाई दो)
फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार 2023 – प्रेम चोप्रा
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना आज 28 एप्रिलला कलर्स या हिंदी वाहिनीवर पाहायाला मिळणार आहे. दरम्यान या पुरस्कार सोहळ्यानंतर अलियासह इतरांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.