Jiah Khan मृत्यू प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सूरज पांचोलीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘सत्याचा नेहमी…’

Jiah Khan मृत्यू प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सूरज पांचोलीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘सत्याचा नेहमी…’

Jiah Khan: अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) हिच्या मृत्यू प्रकरणी आज विशेष सीबीआय कोर्ट आपला निकाल जाहीर केला आहे. या प्रकरणातून अभिनेता सूरज पंचोलीची (Sooraj pancholi) याला निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सूरजने या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यावर आता एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sooraj P (@soorajpancholi)


जिया खान मृत्यू प्रकरणातून निर्दोष मुक्त झाल्यावर सूरजने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केले आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘सत्याचा नेहमी विजय होत असतो.’ या पोस्टमध्ये त्याने हॅशटॅग गॉड इज ग्रेट असे कॅप्शन देखील लिहिले आहे. सूरजच्या या पोस्टने अनेक चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. जिया खानच्या आईने सूरजवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. आता जिया खान मृत्यू प्रकरणातून सूरजची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

सूरजची निर्दोष मुक्तता झाल्यावर जिया खानची आई राबिया खानने सांगितले आहे की, जिया खानला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप फेटाळण्यात आला आहे. या प्रकरणाचा निकाल आज लागला. पण मग माझ्या मुलीचा मृत्यू कशामुळे झाला? असा सवाल निर्माण होतो. मृत्यूचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. मी सुरुवातीपासून सांगितल होत की, हे प्रकरण हत्येचे आहे. आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती

३ जून २०१३ मध्ये जिया खानने मुंबईमधील तिच्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली होती. जिया खानच्या घरात तब्ब्ल ६ पानांची सुसाईड नोट सापडली होती. या सुसाईड नोटमध्ये जियाने सूरजवर अत्याचार, फसवणूक आणि खोटे बोलणे यासह अनेक गंभीर आरोप लावण्यात आले होते. जिया खानची आई राबिया खान यांनी देखील सूरजवर काही गंभीर आरोप केले होते.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती

कोण आहे सूरज पांचोली?

सूरज पांचोली (Sooraj Pancholi) हा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता मानला जातो. चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आदित्य पांचोली यांचा हा मुलगा आहे. सूरजने अभिनयासह सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील मोठ्या प्रमाणात काम केले आहे. सूरजने वयाच्या ९व्या वर्षी मार्शल आर्टचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती.

सूरजचे संपूर्ण शालेय शिक्षण मुंबईमध्ये झाले आहे. शाळेत असताना तो २ वेळेस नापास झाला होता. शिक्षणामध्ये गोडी न निर्माण झाल्याने सूरजने बारावीत असताना शिक्षण सोडले होते. अभ्यासात गोडी नसल्याने सूरजने २०१० मध्ये संजय लीला भन्साळींच्या ‘गुजारिश’ या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केला आहे. या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube