Download App

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात सरकारला दणका, पोलिसांवर गुन्हा दाखल होणार

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात राज्य सरकारला हायकोर्टाने मोठा धक्का देत या प्रकरणात पोलिसांवार गुन्हा दाखल

  • Written By: Last Updated:

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात राज्य सरकारला हायकोर्टाने मोठा धक्का देत या प्रकरणात पोलिसांवार गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहे. या प्रकरणात अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा एन्काऊंटर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार नाही अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती मात्र आता मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) दिलेल्या आदेशानंतर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याने राज्य सरकारला एक मोठा धक्का मानला जात आहे.

अक्षय शिंदे याचा मुंब्रा परिसरात चौकशीसाठी आणताना एन्काऊंटर करण्यात आला होता मात्र हे एन्काऊंटर बनावट असल्याचा तपासात समोर आल्याने पोलीस अधिकाऱ्यांवर  गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती मात्र याच्या विरोधात राज्य सरकारने भूमिका घेत जोपर्यंत एसआयटी अहवाल येत नाही तोपर्यंत गुन्हा दाखल होणार अशी भूमिका सरकारने घेतली होती.

तर दुसरीकडे या सरकारच्या या भूमिकेवर हायकोर्टाने नाराजी व्यक्त करत आज या प्रकरणाचा निकाल देत मुंबई पोलीस सहआयुक्त (गुन्हे) लखमी गौतम यांना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलिसांना देण्याचे आदेश देखील हायकोर्टाने दिले आहे.  या आदेशानंतर आता पुढील दोन दिवसात या प्रकरणात एसआयटी स्ठापन करण्यात येणार आहे आणि स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीला या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा लागणार आहे.

हो…दीनानाथ मंगेशकर रूग्णालय गर्भवती महिलेच्या मृत्यूला जबाबदार – रूपाली चाकणकर

प्रकरण काय?

बदलापूरच्या (Badlapur) एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर ऑगस्ट 2024 मध्ये लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली होती तसेच आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी संपूर्ण राज्यातून होत होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा 23 सप्टेंबर 2023 रोजी पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला होता मात्र एन्काउंटर फेक (Fake Encounter) असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशीसाठी मजिस्ट्रेट चौकशीचे आदेश देण्यात आले होते. 20 जानेवारी 2025 ला मुंबई उच्च न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात एन्काऊंटर फेक असल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली आहे.

कौटुंबिक मनोरंजनाचा धमाल तडका! प्रसाद ओक दिग्दर्शित ‘सुशीला-सुजीत’ ‘या’ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला

चौकशीसाठी जाताना मुंब्रा येथे अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर 2 गोळ्या झाडले तेव्हा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवर तीन गोळ्या झाडले असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता.

follow us