Download App

काँग्रेसमध्ये नक्की काय चाललय?, महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या नियुक्त्या ८ तासात रद्द, कारण आलं समोर

केंद्रीय समितीच्या नियमांप्रमाणे प्रदेशाध्यक्षांसह कोणालाही कसलीही नियुक्ती करायची असेल तर त्यासाठी केंद्रीय समितीची

  • Written By: Last Updated:

Youth Congress appointments cancelled : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाप्रमाणेच युवक काँग्रेसमधून (Congress) समोर आलेली धक्कादायक बातमी आहे. गटबाजीने कळस गाठल्याने मोठी नामुष्की काँग्रेसवर ओढावली आहे. प्रदेश शाखेच्या नव्याने करण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या अखिल भारतीय युवक काँग्रेसने अवघ्या ८ तासांमध्ये रद्द केल्या आहेत.

राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी रात्री १२ वाजता नवीन नियुक्त्यांची यादी अधिकृत व्हॉट्सऍप ग्रुपवर जाहीर केली होती. मात्र, भारतीय युवक काँग्रेसच्या दिल्ली मुख्यालयाने सकाळीच या नियुक्त्या रद्द केल्याचे पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले की, नियुक्त्या कोणत्याही अधिकृत मंजुरीशिवाय केल्या गेल्याने त्या अवैध ठरविण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच ज्यांनी कोणी या नियुक्त्या केल्या त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही दिला.

मुख्यमंत्री फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल

या मध्ये २० प्रदेश उपाध्यक्ष, ८ कार्याध्यक्ष व अन्य अनेक नियुक्त्या होत्या. या घटनेनंतर प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आता कोणामागे रहायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे विद्यमान प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत व अखिल भारतीय युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यातील मतभेद यातून उघड झाले.

केंद्रीय समितीच्या नियमांप्रमाणे प्रदेशाध्यक्षांसह कोणालाही कसलीही नियुक्ती करायची असेल तर त्यासाठी केंद्रीय समितीची मान्यता लागते. राऊत यांनी अशी कोणताही मान्यता घेतली नव्हती. त्यामुळे केंद्रीय समितीने तातडीने दिल्लीहून पत्रक प्रसिद्ध करून फक्त ८ तासांमध्ये या सर्व नियुक्त्या रद्द करून टाकल्या. केंद्रीय समितीमध्ये राष्ट्रीय सचिव असलेल्या अजय चिंकारा,एहसान खान, कुमार रोहित यांच्या या पत्रकावर स्वाक्षऱ्या आहेत. याच पत्रकात त्यांनी कोणत्याही मान्यतेशिवाय कोणाचीही नियुक्ती करणे ही गंभीर व शिस्तभंग करणारी गोष्ट आहे असे म्हटले आहे.

त्याचबरोबर ज्यांनी कोणी या नियुक्त्या केल्या, त्याचा शोध घेऊन संबधितांवर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला आहे. मात्र या नियुक्त्या रद्द केल्या नंतर कुणाल राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी ज्या नियुक्ती केल्या आहे त्यानुसार नवीन कार्यकारणीला मी शुभेच्छा देत आहे. त्यांनी जोमाने कामाला सुरुवात करावी असं म्हणत आपण केलेल्या नियुक्त्या याच अधिकृत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे युवक काँग्रेसमधिल मोठा वाद चव्हाट्यावर आला आहे.

follow us

संबंधित बातम्या