मोठी बातमी! सर्व विरोधी पक्ष निवडणूक आयोगाच्या विरोधात रस्त्यावर उतरणार, संजय राऊतांची घोषणा

आज मुंबईमध्ये विरोधी पक्षांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना ठाकरे गटाने मोठी घोषणा केली.

News Photo (7)

News Photo (7)

आज मुंबईत झालेल्या विरोधी पक्षांच्या  पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करण्यात आली आहे. (Commission) या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे, येत्या 1 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांच्या वतीनं विराट मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत 1 नोव्हेंबर रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या मोर्चाची माहिती दिली. त्यानंतर काँग्रेसच्या वितीने सचिन सावंत यांनी भूमिका मांडली. यावेळी बोलताना संविधानाने प्रत्येकाला मताचा अधिकार दिला आहे. तोच अधिकार लोकांच्या हातून काढून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा विरोध देशपातळीवर झाला पाहिजे. महाराष्ट्रातील तमाम विरोधी पक्ष एकत्र आले आहेत.

…तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा, राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांची, राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी यांची विरोधी पक्षांनी भेट घेत घेतली होती, अशी माहिती त्यांनी दिली.  मात्र विरोधी पक्षाच्या मतांना राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने फार काही किंमत दिलेली दिसत नाही असे म्हणत त्यांनी केंद्रीय नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी मतदारांच्या घोटाळ्याबाबत दिलेल्या माहितीचा पुनरुच्चार केला.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात जवळपास 41लाख मतदार वाढले होते, असे राहुल गांधी यांनी याआधीच सांगितलेले आहे. 16 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या चार दिवसांत महाराष्ट्रात सहा लाख 55 हजार मतदार वाढले, असा दावा सचिन सावंत यांनी केला.

 

Exit mobile version