…तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा, राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा

Raj Thackeray On Election Commision : राज्यात लवकरत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर होणार आहे.

  • Written By: Published:
Raj Thackeray On Election Commision

Raj Thackeray On Election Commision : राज्यात लवकरत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर होणार आहे. यासाठी महाराष्ट्र निवडणूक आयोग तयारी देखील करत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील मतदार यादी जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे.

राज ठाकरे आज मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित मनसेच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी निवडणूक आयोगावर (Election Commision) जोरदार हल्लाबोल करत अनेक गंभीर आरोप केले आहे.

या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, माझ्या महाराष्ट्रातील सर्व मतदारांना माझी विनंती हे की सतर्क राहा. मी आज सर्व यादी प्रमुखांना बोलवलं आहे. सर्व गोष्टी टप्प्या- टप्प्याने होणार आहे. तुम्ही घरा-घरांमध्ये जा आणि याद्या तपासा. आमचे लोक जेव्हा येतील किंवा सहकारी पक्षाचे लोक जेव्हा तुमच्याकडे येतील तेव्हा नागरिकांना सहकार्य करा. एकएका घरांमध्ये आठशे- आठशे लोक भरले जात आहेत. सातशे माणसं, एक हजार माणसं, जे मतदार नाहीत पण अशी सर्व खोटो मतदार भरुन हे निवडणुकांना समोरं जायचं म्हणत आहेत. पण जोपर्यंत ही निवडणूक यादी स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही या महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा असं या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील निवडणुका शांततेत पार पाडायच्या असतील तर पहिली ती मतदार यादी स्वच्छ करा. जो मतदार आहे त्याचा आदर करा. जो खरा मतदार आहे त्याला मतदार करु द्या. कोण सत्तेत येईल आणि कोण पराभूत होईल याच्याशी मला देणंघेणं नाही. पण जे मतदान होईल ते खरं होईल.

निवडणुकीसाठी AIMIM तयार; 25 उमेदवारांची यादी जाहीर

या अनुषंगाने निवडणुका झाल्या पाहिजे असेही या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले. तसेच आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी या मेळाव्यात बोलताना मनसैनिकांना काही महत्वाच्या सूचना देखील दिल्या.

follow us