Download App

असला कुठलाही प्रकार घडला नाही, लाठीचार्ज प्रकरणातील आरोप बावनकुळेंनी फेटाळले

  • Written By: Last Updated:

Chandrashekhar Bawankule On Opposition : आळंदी येथे काल ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी पोलिस व वारकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचे आढळून आले. याघटनेनंतर सर्वस्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule )  म्हणतात. असला कुठलाही प्रकार काल आळंदीत झालेला नाही. पोलिसांनी कोणत्याही वारकऱ्यांवर लाठीचार्ज केलेला नाही. उलट वारकऱ्यांनीच पोलिसांना ढकाबुकी केली. विरोधकांनी या गोष्टीचे राजकारण करू नये असे यावेळी बावनकुळे म्हणाले. ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.(Although nothing happened, Bawankules denied the allegations in the lathi charge case)

गेल्यावर्षी चेंगराचेंगरी झाली, त्या घटनेचे आम्ही राजकारण केले नाही, माझे राजकीय पक्षांना सुद्धा आवाहन आहे की त्यांनी वस्तुस्थिती समजावून घ्यावी. उगाच या घटनेचे राजकारण करू नये असेही बावनकुळे यावेळी म्हणाले.

लाठीचार्ज केलेले हे वारकरी हिंदू नाही का? रोहित पवारांचा सरकारला सवाल

या घटनेला कोण जबाबदार आहे. याची चौकशी सरकार करत आहे. दोषींवर्ती कारवाई केली जाईल. आपल्या फायदासाठी विरोधकांनी याचे राजकारण करू नये. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात यापेक्षा देखील मोठी घटना झाली होती. चेंगराचेंगरी झाली होती. पण आम्ही त्याचे राजकारण केलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी या बाबतची सविस्तर माहिती दिली आहे. या घटनेला कोण जबादार आहे याची देखील माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

सरकारने विरोधीपक्षाला आवाहन केले आहे तर त्यांनी ते स्वीकारले पाहिजे. राजकारण करू नये हा विषय राजकारणाचा नाही असे बावनकुळे म्हणाले.

Tags

follow us