Download App

अमित शाह यांच्या पत्नी सोनम यांचं माहेरात मराठीतून भाषण, शाळेच्या आठवणी सांगितल्या

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्र्यांच्या पत्नी सोनल शाह यांनी त्या कोल्हापूरातील ज्या शाळेत शिकल्या, त्या शाळेच्या शतकमहोत्सवाच्या सांगता समारंभात रविवारी पती अमित शाह यांच्यासोबत हजेरी लावली. सोनल शाह यांनी या शाळेच्या कार्यक्रमात मराठीतून भाषण करत जुन्या शाळेच्या आठवणी जागवल्या.

सोनल यांनी आपल्या भाषणात शाळेचा, वर्गाचा, वर्गमैत्रिणी, शिक्षक, ज्या वर्गात बसत होत्या तेथील बेंच, फळा, एकमेकींच्या डब्यातील खाऊ खाण्याचा, खेळण्याचाही उल्लेख केला. गुजरातपासून दिल्लीपर्यंत फिरलो तरी कोल्हापूरची आणि कोल्हापुरातील माझ्या शाळेची आठवण नेहमी माझ्यासोबत राहील, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

सनातनी व्यक्तीने 5-6 मुले जन्माला घालावीत; देवकीनंदन ठाकुर यांचे वादग्रस्त वक्तव्य

ज्या शाळेत अमित शाह यांच्या पत्नी सोनल शाह शिकल्या, त्या शाळेचे स्वागताध्यक्ष विनोद लोहिया यांनी सोनल शाह यांच्यामुळे शाळेत केंद्रीय गृहमंत्री आल्याचा उल्लेख केला. दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या पत्नी सोनम शहा कोल्हापुरातील असून त्यांचं बालपण आणि शिक्षणही कोल्हापूर जिल्ह्यातच झालं आहे.

भाजपला सोडलं, हिंदुत्व नाही.., Uddhav Thackeray यांचा घणाघात

मंत्री अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान त्यांची शाळेतील या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित होती. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या आठवणी सांगितल्या आहेत. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते.

Sanjay Raut ना ‘ते’ वक्तव्य भोवणार ? ; शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांने दिला इशारा

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न केले म्हणून सोनल शाह यांच्याशी संपर्क झाल्याचाही उल्लेख लोहिया यांनी केला आणि सोनल शाह यांनी आपल्या माहेरच्या या शाळेसाठी वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ दोन वर्षापूर्वीच पाच लाख दिले होते. त्यातून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या पुढच्या कार्यक्रमाचे निमंत्रणही दिले. खुद्द अमित शाह यांनीही पत्नीमुळे या शाळेच्या कार्यक्रमात आल्याचे सांगितले.

Tags

follow us