सनातनी व्यक्तीने 5-6 मुले जन्माला घालावीत; देवकीनंदन ठाकुर यांचे वादग्रस्त वक्तव्य

  • Written By: Published:
Devakinandan

नागपूर : आंतरराष्ट्रीय कथाकार आणि अध्यात्मिक गुरु देवकीनंदन ठाकूर (Guru Devkinandan Thakur) महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जोपर्यंत सनातनी बहुसंख्य आहेत तोपर्यंत भारत धर्मनिरपेक्ष देश असेल. ज्या दिवशी सनातनी अल्पसंख्याक होतील त्या दिवशी भारत धर्मनिरपेक्ष देश म्हणून टिकणार नाही. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण कायदा येईपर्यंत प्रत्येक सनातनी (Sanatani) व्यक्तीने पाच ते सहा मुले जन्माला घालायला हवे, असे वादग्रस्त वक्तव्य देवकीनंदन ठाकुर यांनी केले.

ते नागपुरात बोलत होते. यावेळी त्यांनी सनातन मंडळ स्थापन करण्याची मागणीही केली. एवढेच नाही, तर या मंडळात केवळ धर्माचार्यच असतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

Pankaja Munde : पिंपरी-चिंचवडचा ‘शास्तिकर’ लक्ष्मण जगतापांनी माफ केला

देवकीनंदन ठाकुर म्हणाले, लोकसंख्येवर आजपर्यंत नियंत्रण येऊ शकलेले नाही. लोकसंख्येचा केवढा मोठा स्फोट झाला आहे, याची कल्पनाही कुणी करू शकत नाही. 4 बायका आणि 40 मुलांसारख्या प्रकरणांवर कुणीही बोलत नाही. स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठे आक्रमण सनातन धर्मावरच झाले आहे. माझे म्हणणे आहे की, जोवर लोकसंख्या नियंत्रण कायदा येत नाही, तोवर प्रत्येक सनातनीने अधिकाधिक मुलांना जम्माला घालावे. यासाठी वेळेवर लग्न करा आणि पाच ते सहा मुले जन्माला घाला, असे देवकीनंदन ठाकुर यांनी म्हटले आहे.

 

Tags

follow us