मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र आणि मनसे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची गाडी अडविल्यामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी टोल नाकाच फोडला आहे. रात्री सुमारे अडीच वाजता समृद्धी महामर्गावरील सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा टोल नाक्यावर मनसैनिकांचे खळ्ळखट्याक पाहायला मिळाले. या तोडफोडीत टोल नाक्याचे मोठे नुकसान झाले आहे होते. (Amit Thackeray’s car was stopped even though it has a fast tag, what does the rule of the Ministry of Roads)
दरम्यान, या घटनवर अमित ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, समृद्धीवरुन सिन्नरला जो नाशिकसाठी फाटा आहे, तिथे टोल नाक्याला गाडी थांबवली. गाडीला फास्टटॅग होता, तरी देखील गाडी अडवण्यात आली होती. फास्ट टॅगची काही तरी तांत्रिक अडचण असल्याने त्यांची गाडी अडवण्यात आली होती. अशी माहित स्वतः अमित ठाकरे यांनी दिली होती.
परंतु आता प्रश्न निर्माण होतो तो की फास्ट टॅग असून देखील गाडी अडवता येते का? काय सांगतात रस्ते मंत्रालयाचे नियम पाहुयात…फास्ट टॅगमध्ये बॅलन्स आहे पण फास्टटॅग स्कॅन होत नसेल तर ही चुकी टोल यंत्रणा, टोल प्लाझा, टोल कंत्राटदार, टोल इन्फ्रास्ट्रक्चर आणि सरकारची आहे. त्यापरिस्थितीत ते वाहन Exempted गृहीत धरून टोल (युझर फी) न घेता सोडले पाहिजे असा केंद्र सरकारच्या रस्ते मंत्रालयाचा नियम आहे.
फास्टटॅग मध्ये बॅलन्स आहे पण फास्टटॅग स्कॅन होत नसेल तर ही चुकी टोल यंत्रणा, टोल प्लाझा, टोल कंत्राटदार, टोल इन्फ्रास्ट्रक्चर आणि सरकारची आहे. त्यापरिस्थितीत ते वाहन Exempted गृहीत धरून टोल (युझर फी) न घेता सोडले पाहिजे असा केंद्र सरकारच्या रस्ते मंत्रालयाचे ०७ मे… pic.twitter.com/BNE5aP6UTX
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) July 23, 2023
अमित ठाकरे यांच्या गाडीला फास्ट टॅग असून आणि त्यांच्या फास्ट टॅगमध्ये बॅलन्स असून देखील गाडी अडवल्यानंतर आता सोशल मीडियावर केंद्र सरकारच्या रस्ते मंत्रालयाचा तो नियम व्हायरल होताना दिसत आहे. यावरून असे दिसते की 5 वर्षांपासून अद्याप देखील फास्ट टॅग यंत्राना ही व्यवस्थित चालत नाही. यामुळे केंद्र सरकारच्या रस्ते मंत्रालयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहे.