Download App

उद्धव ठाकरेंनी विरोधात उमेदवार दिला तरी फरक पडणार नाही; उमेदवारीनंतर अमित ठाकरे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे तुमच्या विरोधात उमेदवार देतील का? असं विचारलं असता अमित ठाकरे म्हणाले मला काही फरक पडत नाही. मी प्रामाणिकपणे

  • Written By: Last Updated:

Amit Thackeray press conference : राजकारणात जाण्याची माझी इच्छा आहे. परंतु, राज ठाकरे यांच्यावर मी दबाव टाकणार नाही असं ठरवलं होत. मला ज्यावेळी राज ठाकरे यांनी विचारलं की तुला राजकारणात जायचे आहे का? त्यावर मी फक्त तुम्ही दिली संधी तर जाणार. मी तुमच्यावर कोणताही दबाव आणणार नाही असं सांगितलं होत अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली आहे. ते विधानसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदा पत्रकारांशी बोलत होते.

माझ्यात आत्मविश्वास खूप आहे. पण उमेदवार यादीत माझं नाव आल्यानंतर माझ्या पोटात गोळा आला. कारण आता मला समजलं आहे की माझं आयुष्य पूर्णपणे चेंज होणार आहे. मी याआधी जसं वावरत होतो, तसं आता वावरु शकत नाही. मी जे स्वतंत्रपणे राहत होतो, तसं आता राहू शकणार नाही. कारण त्या शासकीय पदाचे ओझं इतकं असतं. मी ते ओझं घ्यायला तयार आहे. फक्त आता पोटात गोळा आला आहे असंही अमित ठाकरे म्हणाले आहेत.

Video: प्रियंका गांधी वायनाड लोकसभेच्या मैदानात; लाखो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज

उद्धव ठाकरे तुमच्या विरोधात उमेदवार देतील का? असं विचारलं असता अमित ठाकरे म्हणाले मला काही फरक पडत नाही. मी प्रामाणिकपणे काण करत राहणार आहे. तसंच, मला विश्वास आहे की मी निवडणूक येणार आहे. आजपर्यंत ठाकरे घराण्यात पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर रिमोट कंट्रोलने सर्व चालवणारे कदाचित राज ठाकरे शेवटे नेते असतील असंही अमित ठाकरे म्हणाले आहेत. तसंच,  यावेळी निवडणुकीनंतर तुम्ही कुणासोबत जाणार महायुती की महाविकास आघाडीसोबत जाणार असं विचारल्यावर अमित ठाकरे म्हणाले आमचे 150 येऊ शकत नाहीत का? असं म्हणत आम्हीही बहुमतात येऊ शकतो असंही अमित ठाकरे म्हणाले आहेत.

मी लहानपणापासून दादर माहीममध्ये वाढलो आहे. माझी आई, माझे वडील किंवा मी आमच्या तीन पिढ्या आम्ही इथे वाढलो आहे. त्यामुळे दादर-माहीम हा मतदारसंघ आम्ही जवळून ओळखतो. मी अनेकदा इथे चालत असताना मला अनेकजण भेटतात. ते त्यांच्या समस्या सांगतात. मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे दादर-माहीम हा मतदारसंघ माझ्यासाठी एक कम्फर्ट झोन आहे, असेही अमित ठाकरे म्हणाले. मी सिद्धिविनायक मंदिरात अनेकदा जातो. माझी इच्छा झाली की मी सिद्धिविनायक मंदिरात चालत जातो. तिथे जाऊन पाया पडून येतो. तिथे जाऊन काही मागत नाही. त्याने खूप दिलेलं आहे, असेही अमित ठाकरेंनी सांगितले.

follow us