कितीही प्रेशर टाकलं तरी…, पोस्टर वादानंतर अमित ठाकरे पुण्यात,आयुक्तांची घेतली भेट
Amit Thackeray हे आज पुण्यात आले आहेत. मनसे आणि अभाविपरिषदेमध्ये झालेल्या पोस्टर वादानंतर ते थेट पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे.

Amit Thackeray Will Meet to Pune Police Comissioner after Poster Clashesh MNS and ABVP : मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे आज पुण्यामध्ये दाखल झाले आहेत. पुण्यामध्ये मनसे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये झालेल्या पोस्टर वादानंतर ते थेट पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेतलीआहे.
Cash होईल कचरा! रॉबर्ट कियोसाकींचा इशारा; सोनं, चांदी, बिटकॉईनमध्ये पैसा गुंतवा
कितीही प्रेशर टाकलं तरी…
यावेळी बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, काल जो राडा झाला. त्यानंतर मी आज आयुक्तांना भेटायला आलो आहे. हे दुसऱ्यांदा झालं आहे. ते जरी सत्तेत असले, कितीही प्रेशर टाकलं तरी काही फरक पडणार नाही. मी माझ्या मुलांसोबत आहे.तुम्ही बोट घातलं तर आम्ही हात घालणार. ॲक्शनला रिएक्शन मिळणारच. कायदा सुव्यवस्था मला बिघडवायची नाही. मी एवढेच सांगतोय की, कायदा हा सगळ्यांना समान असला पाहिजे. दुसऱ्यांच्यामध्ये येण्यापेक्षा स्वतःचा अस्तित्व निर्माण करा. तर आमच्यावर ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल केला आहे. छोटा गुन्हा आहे. गुन्हे अंगावर घ्यायचे आम्हाला सवय आहे.
पुण्यातील जुन्या कात्रज घाटात भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी
जे पोस्टर लावलेला आहे. त्यावर मी आयुक्तांशी बोललो आहे. सीसीटीव्ही फुटेज आहे. ते जर त्यांची मुलं निघाली तर त्यांचे सर्व ऑफिसेस बंद करावे लागतील. यापुढे जर आम्ही पोस्टर लावले आणि बॉयकॉट लिहिलं तर चालेल का? ती मुले कोण आहेत? ते बघू, यापुढे आमची अशीच रिएक्शन मिळणार. काल एका ऑफिसला टाळे ठोकले आहे. असं म्हणत अभाविपला अमित ठाकरेंनी इशाराच दिला.
महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर घुमणार ‘अगं अगं आई…, ओंकार भोजनेची दणक्यात एन्ट्री
तसेच ते पुढे म्हणाले की, पुण्याची भीषण परिस्थिती झाली आहे. ड्रग्ज, महिलांवर अत्याचार, लहान मुलांना दारू , पोर्शे अपघातात दोन मुलांची उडवलं. काय झाले पुढे त्याचे? यावर फक्त पोलीस आयुक्त काम करू शकतात. हे आज मी सांगून आलेलो आहे. अठरा वर्षाखालील मुलांना ड्रग्ज, दारू देत असाल तर हे भीषण आहे याची आम्ही लिस्ट तयार करणार आहोत.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील मनसेच्या एका शाखेवर अभाविपने काही पोस्टर्स लावले होते. त्यावर बॉयकॉट मनसे अशा आशय लिहिला गेला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी अभाविपच्या कार्यालयाला ताळं ठोकंल होतं. त्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यावादामध्ये मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे आज पुण्यामध्ये दाखल झाले आहेत.