‘अमृता’ नाव लकी, अमोल कोल्हे करणार अमृता खानविलकरसोबत लग्न? कोल्हेंनी शेअर केली पोस्ट

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे कायम कोणत्याना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. आता देखील असेच काही कारण आहे. अमोल कोल्हे यांनी थेट अभिनेत्री अमृता खानविलकरसोबत लग्न करणार असल्याची पोस्ट इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळासह चित्रपट शृष्टीत चर्चा रंगू लागल्या आहेत. ही पोस्ट म्हणजे एका वृत्तपत्राची बातमी आहे, या बातमीचं कात्रण अमोल कोल्हेंनी पोस्ट केले […]

WhatsApp Image 2023 04 02 At 11.31.07 AM

WhatsApp Image 2023 04 02 At 11.31.07 AM

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे कायम कोणत्याना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. आता देखील असेच काही कारण आहे. अमोल कोल्हे यांनी थेट अभिनेत्री अमृता खानविलकरसोबत लग्न करणार असल्याची पोस्ट इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळासह चित्रपट शृष्टीत चर्चा रंगू लागल्या आहेत.

ही पोस्ट म्हणजे एका वृत्तपत्राची बातमी आहे, या बातमीचं कात्रण अमोल कोल्हेंनी पोस्ट केले आहे. या पोस्टमध्ये अमोल कोल्हे हे बायकोला कंटाळले आहेत. मराठी चित्रपट अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या प्रेमात पडले आहेत. ते लवकरच बायकोला घटस्फोट देऊन व अमृता खानविलकर ही देखील तिच्या पतीला घटस्फोट देणार आहे. आणि हे दोघे विवाहबद्ध होणार असल्याच्या चर्चा चित्रपट क्षेत्रात आहेत. या विवाहाचा माझ्या राजकीय कारकिर्दीवर काहीही परिणाम होणार नाही. उलट अमृताशी लग्न केल्याने मी उपमुख्यमंत्री होईल कारण अमृता नाव हे राजकारण्यांना लकी आहे. असे ते म्हणाले

अमोल कोल्हेचा या पोस्टवर नेटकऱ्यानी गमतीशीर कमेंट देखील केल्या आहेत. तसेच या पोस्ट वर अमृता खानविलकर हिने देखील हे काय आहे अशी कमेंट केली आहे. आणि त्यावर तिने चक्कर येणाऱ्या इमोजी देखील टाकल्या आहेत.अमृताचा या कमेंटला उत्तर देताना अमोल कोल्हे म्हणतात हा शुद्ध गाढवपणा ! इकडून तिकडे व्हायरल होऊन फालतू गॉसिप होण्यापेक्षा..सरळ चिरफाड बरी मला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद.

अमोल कोल्हेंन बद्दल बोलायचं झालं तर ते राष्ट्रवादी कांग्रेसचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत. ते सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असतात. त्यांना संसदेतील उत्तम कामासाठी संसदपट्टू हा बहुमान देखील मिळाला आहे.तसेच ते राजकारणासोबत चित्रपटात देखील ऍक्टिव्ह असतात. त्यांचा गरुडझेप हा मराठी चित्रपट आताच प्रदर्शित झाला.

Exit mobile version