Amruta Fadanvis : अमृता फडणवीसांना 1 कोटींची लाच ऑफर; तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Amruta Fadavis :  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एका डिझायनरने लाच देण्याच प्रयत्न केला आहे. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबईच्या मलबार हिल पोलिस ठाण्यात अमृता फडणवीसांनी ही तक्रार दाखल केली आहे. अनिक्षा नावाच्या डिझायनरच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून तपासाला सुरुवात केली आहे. त्यांच्या […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 16T104847.401

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 16T104847.401

Amruta Fadavis :  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एका डिझायनरने लाच देण्याच प्रयत्न केला आहे. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबईच्या मलबार हिल पोलिस ठाण्यात अमृता फडणवीसांनी ही तक्रार दाखल केली आहे.

अनिक्षा नावाच्या डिझायनरच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून तपासाला सुरुवात केली आहे. त्यांच्या विरोधात धमकावणे, कट रचणे व लाच ऑफर करणे ही कलमे लावण्यात आलेली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ही डिझायनर अमृता फडणवीसांच्या संपर्कात होताी. गेली 16 महिने ही महिला त्यांच्या संपर्कात होती. तिने दिलेले वेगवेगळे कपडे घालावे असे या महिलेचे म्हणणे होते. यामध्ये त्या महिलेच्या वडिलांच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Delhi Capitals New Captain : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरकडे दिल्ली कॅपिटल्सची धुरा

ती महिला डिझायनर असल्याने तिने दिलेले कपडे वेगवेगळ्या कार्यक्रमात अमृता यांनी घालावे अशी तिची इच्छा होती, म्हणून त्या महिलेशी माझा संपर्क आल्याचे अमृता यांनी म्हटले आहे. एका गुन्ह्यामध्ये मदत करावी अशी विनंती या महिलेने अमृता यांना केली होती. पण शेवटी त्रासाला कंटाळून त्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, अमृता फडणवीस या कायम सोशल मीडियवर सक्रीय असतात. त्यांचे काही दिवसांपूर्वी पंजाबी गाणे लाँच झाले होते. त्यांच्या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यांचे गाण्याचे अनेक अल्बम प्रसिद्ध झाले आहेत.  या व्यतिरिक्त अमृता फडणवीस या सामाजिक कार्यक्रमामध्ये देखील सहभागी असल्याचे पहायला मिळाले आहे.

Shahaji Bapu Patil : बजेटवर काय बोलायचं हा प्रश्न अजित पवारांसमोर होता; शहाजी पाटील यांचा निशाणा

Exit mobile version