Download App

Amruta Fadanvis यांनी खास पद्धतीने दिल्या होळीच्या शुभेच्छा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांच्या पत्नी अमृता फडणवीस  (Amruta Fadanvis) या कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्या सोशल मीडियावर आपली गाणी व रील्स टाकत असतात. आज त्यांनी आपली मुलगी दिवीजासोबत रंग खेळतानाचा व्हीडिओ ट्विटरवर टाकला आहे.

आज धुळवड असून सर्व जण आज रंग खेळत असतात.त्यानिमित्ताने अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडेलवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून त्यांनी सर्व नागरिकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत व्हिडीओमध्ये त्यांची मुलगी दिवीजादेखील आहे.

…असा नशा करण्यापेक्षा भक्ती, कामाचा करा; फडणवीस अर्थसंकल्पात ‘रंग’ आणणार

त्यांच्यासोबत या होव्हिडिओत एक पक्षी देखील दिसतोय.  सर्व नागरिकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा, असे कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिले आहे. याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील होळी खेळताना आज पहायला मिळाले. अमृता  फडणवीस या कायम सोशल मीडियावर सक्रीय दिसतात. काही दिवसांपूर्वी त्यांचे पंजाबी गाणे आले होते. त्या गाण्याला तुफान प्रसिद्धी मिळाली होती.

Girish Bapat-Sanjay Kakde आजी-माजी खासदारांची धुळवड राजकारणात नव्याने रंग भरणार?

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होळी व रंगपचमीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.  महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व जनतेला होळीच्या  शुभेच्छा देतो. होळी आणि रंगपंचमी  एक अशा प्रकारचं पर्व आहे, की ज्यामध्ये आपण होलिका देवीच्या ज्वालांमध्ये जे-जे वाईट आहे, ते आपण जाळून देतो आणि एक नवीन सुरुवात करतो. दुसरीकडं रंगोत्सवाच्या माध्यमातून एकमेकांला एकमेकांच्या रंगामध्ये रंगवतो. हे जग सप्तरंगी आहे, हे देखील दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं निश्चितपणे जसे होळीचे विविध रंग आहेत तसे आमच्या बजेटचे  वेगवेगळे रंग पाहायला मिळतील आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प आपल्याला पाहायला मिळेल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी म्हटलंय.

Tags

follow us