Girish Bapat-Sanjay Kakde आजी-माजी खासदारांची धुळवड राजकारणात नव्याने रंग भरणार?

Girish Bapat-Sanjay Kakde आजी-माजी खासदारांची धुळवड राजकारणात नव्याने रंग भरणार?

पुणे : राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) यांनी मंगळवारी पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. तसेच होळीच्या (Holi) शुभेच्छा देत धुलिवंदन साजरे केले. मात्र, या पार्श्वभूमीवर आजी-माजी खासदारांची धुळवड भविष्यातील राजकारणात (Politics) नव्याने रंग भरतील का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरु झाली आहे.

होळी, धुळवडीच्या सणानिमित्त संपूर्ण देश रंगात रंगत असताना पुण्याचे खासदार गिरीश बापट आणि राज्य सभेचे माजी खासदार व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी एकमेकांना रंग लावत रंगांची उधळण केली. तसेच होळी आणि धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली.

Mangaldas Bandal यांनी खरंच किती कोटींना शिवाजीराव भोसले बँकेला बुडवले?

बापट आणि काकडे या आजी माजी खासदारांनी एकमेकांना लावलेले रंग येणाऱ्या भविष्यात नव्याने राजकीय रंग भरतील काय अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातील राजकारणाची ही नवीन नांदी ठरणार का हे येणाऱ्या काळात आपल्याला बघायला मिळेल.

पुण्याचे खासदार असलेले गिरीश बापट हे राजकारणातील भन्नाट व्यक्तिमत्त्व. नगरसेवक, आमदार, मंत्री ते खासदार असा बापट साहेबांचा प्रवास राजकारण आणि समाजकारणात काम करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक आहे. आजारपणामुळे जास्त नेळ देता आला नसल्याने नुकत्याच झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार पडला.

पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदार संघातून सलग पाचवेळा गिरीश बापट विजयी झाले आहेत. पाच वर्षे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले बापट सध्या पुण्याचे विद्यमान खासदार आहेत. पुण्यासह महाराष्ट्राच्या राजकारण व समाजकारणात त्यांचा अनुभव प्रदीर्घ आहे.

होळी व धुळवडीच्या पार्श्वभूमीवर बापट यांच्यासोबत रंग खेळून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी माजी खासदार संजय काकडे यांनी प्रार्थना केली तर, खासदार गिरीश बापट यांनी काकडे यांना पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube