Mangaldas Bandal यांनी खरंच किती कोटींना शिवाजीराव भोसले बँकेला बुडवले?
पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत (Shivajirao Bhosle Co-Oprative Bank) माझ्या किंवा माझ्या नातेवाईकांच्या नावाने जे कर्ज प्रकरणे होती. ती सर्व मी फेडलेली आहेत. मात्र, मध्यंतरी बरीच राजकीय परिस्थिती बदलल्याने मला या प्रकरणात माझ्या राजकीय विरोधकांनी नाहक घोवले आहे. माझे करोडो रुपयांचे व्यवहार आहेत. मी आणि माझ्या पत्नीच्या नावाने ज्यावेळी शिवाजीराव भोसले सहकारी संस्थेतून दोन कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यासाठी मी १० कोटी रुपयांचे मॉर्गेज दिले होते. त्या कर्ज प्रकरणात फक्त २० लाख रुपये भरायचे राहिले आहे. बाकी कोणत्याही प्रकारे मी कर्ज बुडवलेले नाही, असा दावा पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांनी केला आहे.
शिवाजीराव भोसले सहकारी बँक आर्थिक फसवणूक आणि खंडणीप्रकरणात अटक झाल्यानंतर तसेच तब्ब्ल १६ महिन्यानंतर जेलमधून बाहेर आल्यानंतर मंगलदास बांदल यांनी जेलमध्ये काय काय घडले ते सांगितले आहे. तसेच स्वतःच्या नावावर आणि बेनामी लोकांच्या नावावर खरंच कर्ज घेतले का आणि करोडोंचे व्यवहार असूनही साधं पॅन कार्ड नाही, याबाबतही खुलासा केला.
Ajit Pawar : शिंदे-फडणवीसाकडून फक्त सरकार टिकवण्यासाठी धडपड!
मंगलदास बांदल म्हणाले की, शिवाजीराव भोसले बँकेत मला केवळ राजकीय परिस्थिती बदलल्याने माझ्या हितचिंतकांनी अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. ते केवळ कोणाच्यातरी सांगण्यावरून हा प्रकार केला आहे. मी जर ७०-८० कोटी रुपयांना भोसले सहकारी बँकेला फसवले असते तर मला जामीन मिळाला असता का, हा केवळ विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून मला अडकवले. परंतु, आज तेच प्रवीण चव्हाण जेलमध्ये गेले आहेत. आता त्यांना सर्व व्यवस्थित समजेल की एखाद्याला अडकवल्यानंतर कधीतरी ती परिस्थिती आपल्यावरही येते. काल ते सुपात होते आणि मी जात्यात होतो. आज मी सुपात आलो आणि ते जात्यात गेले आहेत.
भाईचंद हिराचंद बँकेचे सुनील जव्हर हे माझे चांगले मित्र आहेत. प्रवीण चव्हाण या विशेष सरकारी वकिलांनी सुनील जव्हर यांच्याकडुन करोडो रुपये घेतले आणि मी तुम्हाला सहिसलामत बाहेर काढतो असे सांगितले. पण प्रत्यक्षात काही केले नाही. उलट त्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून लोकांना अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते आज जेलमध्ये गेले आहेत, असा दावा मंगलदास बांदल यांनी केला आहे.