Ajit Pawar : शिंदे-फडणवीसाकडून फक्त सरकार टिकवण्यासाठी धडपड!
पाथर्डी : एका-एका मंत्र्याकडे ६-६ जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. लोकांची कामं कशी होणार आहे. शिंदे गटातील ४० आमदारांना तुला मंत्री करतो म्हणून केवळ आश्वासन दिले जात आहे. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस (Eknath Shinde-Devendra Fadanvis) सरकारमधील आमदार अश्वस्त आहेत. तर शिंदे-फडणवीस यांच्याकडून केवळ सरकार टिकवण्यासाठी धडपड सुरु आहे, अशी घणाघाती टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर सभेत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले की, राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पण शिंदे-फडणवीस सरकारला त्याचे काहीही गांभीर्य नाही. शेतकरी वाऱ्यावर आहे. याबाबत उद्या मी अधिवेशनात आवाज उठवणार आहे.
Holi Celebration : ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा देत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने शिमगा!
अजित पवार म्हणाले की, राज्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकऱ्यांकडे बघायला शिंदे-फडणवीस यांना वेळ नाही. एका मंत्र्यांकडे ६-६ जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. तो कसा या जिल्ह्यांना न्याय देणार आहे. त्याला वेळ तरी मिळणार आहे का, पण शिंदे-फडणवीस सरकारला त्याचे काहीही गांभीर्य नाही. केवळ सरकार टिकवण्यासाठी दिवस ढकलण्याचे काम सुरु आहे. अशांनी राज्य कसे पुढे जाणार आहे. राज्यात गारपिटीमुळे शेतकऱ्यांची उभी पिके भुईसपाट झाली आहे. कापूस, कांदा, सोयाबीन, द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या घास हिरवला गेला आहे. राज्यातील शेतकरी प्रचंड हवालदिल झाला असताना त्याला आधार देणे हे राज्य सरकारचे काम आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुके दुष्काळग्रस्त आहेत. त्यात आता पुन्हा अवकाळी पावसाने उभी पिके गेली आहेत. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने शेतकऱ्यांकडे पाहायला मंत्रीच नाही. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री हे निवडणूक प्रचार आणि फिरण्यातच व्यस्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. कांद्याला मातीमोल भाव दिल्याने आधीच शेतकरी आर्थिक संकटात असून उत्पादन खर्चही निघत नाही. त्यात आता गारपिटीमुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.