Amruta Fadnavis’ indirect attack on Sanjay Raut : मुंबई शहरातील जनरल पोस्ट ऑफिस अंतर्गत कार्यरत पोस्ट कर्मचाऱ्यांसाठी आज एक महत्वाचा आणि पर्यावरणपूर्वक उपक्रम राबवण्यात आला. पत्रवहन आणि टपाल सेवा अधिक जलद, सुलभ आणि शाश्वत करण्याच्या दृष्टीने पोस्टमन तसेच महिला कर्मचाऱ्यांना एकूण 200 इलेक्ट्रिक बाइक्सचे वितरण करण्यात आले. या ई-बाईक्सचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी पोस्ट ऑफिसचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारीआणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, डिलेव्हरी आणि पार्सल देताना पर्यावरणपूर्वक पर्याय स्वीकारणं ही काळाची गरज आहे. इलेक्ट्रिक बाईक्समुळे शाश्वत विकासाच्या दिशेने एक ठोस पाऊल टाकलं जात आहे. आनंदाची बाब म्हणजे जीपीओसारखी संस्था पर्यावरण आणि विकास यांचा उत्तम समतोल साधत आहे. बोलताना त्या पुढे म्हणाल्या जेव्हा 100 पोस्टमास्टर आणि महिला कर्मचारी ई-बाइक्सवरून सेवा देतील, तेव्हा पर्यावरण संरक्षणात त्यांचाही सक्रिय सहभाग असेल. चांगलं पर्यावरण आणि विकास हवा असेल, तर अशा उपक्रमांतूनच ते प्रत्यक्षात दिसून येतं.
मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी आणि सपा अशी नवी आघाडी; सत्तास्थापनेत 6 नगरसेवक ठरू शकतात निर्णायक
कार्यक्रमादरम्यान अमृता फडणवीस यांनी जय श्री राम चा नारा दिला. त्या म्हणाल्या हा कार्यक्रम अचानक ठरला, अमिताभ यांनी बोलावलं म्हणून मला यावंच लागलं. तुमच्यावर टपाल पोहोचवण्याची मोठी जबाबदारी आहे. तुम्ही संस्कृती जपता आणि स्वतःला सतत अपग्रेड करता, ही खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे. यावेळी त्यांनी जीपीओतील महिलांच्या सहभागावरही विशेष भर दिला. जीपीओमध्ये जवळपास 50 टक्के महिला कर्मचारी आहेत. तर पोस्ट ऑफिसमध्ये 100 टक्के महिला कर्मचारी कार्यरत आहेत. लोकसेवात स्त्रिया आघाडीवर आहेत, आणि जीपीओ त्याच उत्तम उदाहरण असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
देशप्रेमाच्या मुद्द्यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, जोपर्यंत आपण इतिहासाकडे पाहत नाही, तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. 1971 च्या लढाईची आठवण करून देणं गरजेचं आहे. त्यामुळे राष्ट्रप्रेमाला उजाळा मिळतो आणि त्याचा प्रकाश दूरपर्यंत जातो. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावरून झालेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केलं की, देवेंद्र फडणवीस हे दावोसला पिकनिकसाठी नाही, तर महाराष्ट्रासाठी गुंतवणूक आणण्यासाठी गेले आहेत. महाराष्ट्राला एक आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म मिळतो आहे. हे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे, तीन दिवसांची पिकनिक नाही. आणि पिकनिकला ते माझ्याशिवाय जाऊ शकत नाही, असा अप्रत्यक्ष टोला देखील यावेळी त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
अहिल्यानगर महापालिकेत भाजपकडून धनगर समाजातील शारदा ढवण यांची गटनेतेपदी निवड
महापौरपदाबाबत बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, मुंबई महापालिकेत महायुतीचा मराठी माणूस महापौर होणार आहे. शेवटी त्या म्हणाल्या देशप्रेम आणि राष्ट्रसेवेसाठी देवेंद्रजी आज दावोसमध्ये आहेत. आज मी त्यांची प्रतिनिधी म्हणून येथे आले आहे. तुम्हाला पाहून स्पष्टपणे दिसतं की, आपला देश प्रामाणिक लोकांच्या हातात सुरक्षित आहे. एक नवा भारत पुढे चालला आहे. या उपक्रमामुळे मुंबईतील पोस्टल सेवा अधिक आधुनिक, पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम होण्यास मदत होणार असल्याचं स्पष्ट होत आहे.
