सुरेश धसांच्या तक्रारींची दखल; अजित पवारांचा धनंजय मुंडेंना दणका

बीड : भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर केलेल्या गैरव्यवहारांच्या आरोपांची अखेर दखल घेण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या आरोपांच्या चौकशीसाठी समितीची स्थापना केली आहे. मागील दोन वर्षात प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची चौकशी हे पथक करणार आहे. (An investigation will be […]

Ajit Pawar And Dhananjay Munde

Ajit Pawar And Dhananjay Munde

बीड : भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर केलेल्या गैरव्यवहारांच्या आरोपांची अखेर दखल घेण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या आरोपांच्या चौकशीसाठी समितीची स्थापना केली आहे. मागील दोन वर्षात प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची चौकशी हे पथक करणार आहे. (An investigation will be conducted into the allegations made by BJP MLA Suresh Dhas against Minister Dhananjay Munde.)

अवर सचिव सुषमा कांबळी यांच्या आदेशान्वये स्थापन झालेल्या या पथकात तिघांचा समावेश आहे. धाराशिव जिल्ह्यातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर हे समितीचे अध्यक्ष. तर अर्थ आणि सांख्यिकी संचालनालय, मुंबईचे अपर संचालक म. का. भांगे आणि जालना जिल्ह्याचे जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी हे दोघे सदस्य आहेत.

Video : ‘मेक इन इंडिया’ बेरोजगारी अन्…; मोदींना सुनावतांना राहुल गांधींचा काँग्रेसलाही घरचा ‘आहेर’

या तीन सदस्यीय पथकाने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे कामाची प्रशासकीय मान्यता व निधी वितरण याबाबत माहिती मागितली आहे. यावर जिल्हाधिकऱ्यांनी झेडपी सीईओ व नगर पालिकेचे सीओ यांना पत्र व्यवहार केला असून तात्काळ माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.

अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना 2023-24 आणि 2024-25 मध्ये कामांना दिलेल्या प्रशासकीय मान्यतेची चौकशी करणे, शासनाच्या प्रचलित नियम, तरतुदी विचारात घेऊन सर्व संबंधित अभिलेख्यांची काम व दिनांकनिहाय चौकशी करणे, प्रशासकीय मान्यता दिलेल्या सर्व कामांची सद्यस्थिती व त्या कामांना दिलेली तांत्रिक मान्यता तपासून घेणे असे या समितीला निर्देश देण्यात आले आहेत. या चौकशीसाठी समितीला आठवडाभराची मुदत देण्यात आली आहे.

भाजपवाल्यांनाही आपल्या जिल्ह्याचा बीड होऊ द्यायचा नाही; वडेट्टीवार-मुनगंटीवार आमने-सामने

धनंजय मुंडे हे पालकमंत्री असताना 73 कोटी 36 लाख रुपयांची काम न करता बोगस बिलं उचलली, असा आरोप आमदार धस यांनी केला आहे. याबाबत त्यांनी अजित पवार यांच्याकडे यापूर्वी लिखीत तक्रार दिली आहे. तसेच या आरोपांशी संबंधित पुरावे असलेला एक पेनड्राईव्हही धस यांनी अजित पवार यांच्याकडे दिला आहे. आता या आरोपांची दखल घेण्यात आली असून समितीची स्थापना करण्यात आली आहे.

 

Exit mobile version