Download App

हत्याकांडाने सातारा हादरला; अज्ञान व्यक्तीने महिलेच्या घरात घुसून गळा चिरला

सातारा तालुक्यातील शिवथर येथे अज्ञात व्यक्तीने एका विवाहित महिलेचा तिच्या राहत्या घरी गळा चिरुन निघृन खून केल्याची घटना घडली.

Satara Crime : सातारा तालुक्यातील शिवथर येथे अज्ञात व्यक्तीने एका विवाहित महिलेचा तिच्या राहत्या घरी गळा चिरुन निघृन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Crime) पूजा प्रथमेश जाधव असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. दरम्यान, खुनाचे कारण मात्र अस्पष्ट आहे. घटनास्थळी सातारा तालुका पोलीस दाखल झाले आहेत.

घरात कोणीही नसताना अज्ञात व्यक्तीने संबंधित महिलेचा गळा चिरून खून करून तो पसार झाला आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. या प्रकरणातील आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, या खुनाच कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तसेच या घटनेमागे नेमकं कोण आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत.

Video : भास्कर जाधवांचा थेट अजित पवारांवर घाव; म्हणाले, कुणाला किती पैसे द्यायचे हे अर्थमंत्री..

Tags

follow us