अनिल देशमुख, नवाब मलिकांना ते स्वातंत्र्यसैनिक म्हणतील, मुख्यमंत्र्यांचा खोचक टोला

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांचा रोजचा थयथयाट सुरु आहे. त्यांनी फक्त जागा बदलेली आहे. त्यांना आरोप-प्रत्यारोप केल्याशिवाय दिवस जात नाही. त्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. त्यामुळं त्यांनी आरोप करावेत, आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ, अनिल देशमुख (Anil Deshmukh)आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणालाही ही मंडळी मागंपुढं बघणार नाहीत असा खोचक टोला मुख्यमंत्री […]

Eknath Shinde 1

Eknath Shinde 1

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांचा रोजचा थयथयाट सुरु आहे. त्यांनी फक्त जागा बदलेली आहे. त्यांना आरोप-प्रत्यारोप केल्याशिवाय दिवस जात नाही. त्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. त्यामुळं त्यांनी आरोप करावेत, आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ, अनिल देशमुख (Anil Deshmukh)आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणालाही ही मंडळी मागंपुढं बघणार नाहीत असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांना लगावलाय.

एकनाथ शिंदे म्हणाले की, आमच्या सरकारचा विकास पाहून त्यांना पोटदुखी झाली आहे. या इलाज आम्ही बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात ठेवला आहे, असा टोला देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला आहे.

डोंबिवलीत नागरिक रात्रीच्यावेळी अचानक उतरले रस्त्यावर; वाहतूक कोंडी

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आमचं काम पाहून विरोधकांच्या छातीत धडकी भरलीय. कसब्यातील पोटनिवडणुकीच्या एका विजयानं ते एवढे हुरळून गेले आहेत की त्यांना वाटतं आता राज्य आणि देशामध्ये बदल घडेल. पण त्याचबरोबर तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष जिंकला हे त्यांना दिसत नाही.

यापूर्वीदेखील बदलाचे वारे वाहून गेले असा अंदाज लावण्यात आला होता. मात्र 2019 मध्ये देखील साडेतीनशे पेक्षा जास्तीच्या जागा मोदींच्या नेतृत्वात जिंकल्या. आताही येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये 400 पेक्षा जास्त जागा महायुतीला विजय मिळेल आणि सर्व विरोधकांचा धुव्वा उडेल, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.

Exit mobile version