डोंबिवलीत नागरिक रात्रीच्यावेळी अचानक उतरले रस्त्यावर; वाहतूक कोंडी
ठाणे : डोंबिवलीत कल्याण शीळ रोडवर (Kalyan Shil Road) आज रात्री अचानक 200 ते 250 नागरिकांनी थेट रास्ता रोको आंदोलन पुकारलं. यत महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहिती मिळत आहे. या नागरिकांनी थेट रस्ता अडवून ठेवला. त्यामुळं प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित आंदोलक हे डोंबिवली पूर्वेतील शांती उपवन कॉम्प्लेक्समधील रहिवाशी आहेत. त्यांच्या इमारतीला तडा गेल्यानं ते आज बेघर झाले आहेत. त्यांच्या इमारतीचं पाडकाम आता केडीएमसीकडून सुरु आहे. या घटनेमुळं संतापलेल्या नागरिकांनी बिल्डरच्या विरोधात रोष व्यक्त करत रास्ता रोको केलं.
विरोधकांचा राजकीय भांडवल करुन त्रास देण्याचा उद्योग
या नागरिकांनी कल्याण शीळ रोडवर पलावा जंक्शन येथे रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळं परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं.
शांती उपवन कॉम्प्लेक्समधील एका विंगला तडा गेल्यानं शनिवारी 240 कुटुंबीयांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. आपल्या राहत्या घराच्या प्रश्न निर्माण झाल्यानं रहिवाशी संतप्त झाले आहेत. लोढा बिल्डरनं प्रत्यक्ष येवून घरांबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे. दरम्यान, पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.