Anjali Damania Allegations Against Nitin Gadkari : अंजली दमानिया यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, भांडूपमधल्या 600 कुटुंबांची घरे आणि त्यांची खालची जमीन असूनही ती जमीन एका शिरोडकर नावाच्या व्यक्तीस विकली गेली. भांडूपमधल्या 600 कुटूंबाची घरे आणि त्यांच्या खालची जमीन याची मालकी घरं असताना सुद्धा तिथल्या लॅंडलॅार्डने शिरोडकर नावाच्या व्यक्तीला ती जमीन विकली. इथेनॉल आणि रस्ते क्षेत्रात गडकरींशी संबंधित असंख्य कंपन्या असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. टोलमधून जमा होणारा पैसा आयडीएल नावाच्या कंपनीच्या माध्यमातून थेट गडकरी यांच्या मुलांसाठी स्थापन केलेल्या कंपनीकडे वळवला गेला, असंही दमानिया यांनी म्हटलं आहे.
मी (Anjali Damania) माझा इगो बाजूला सारून मी गडकरी यांना (Nitin Gadkari) भेटायला गेले. त्यांना विनंती केली, भीक मागितली की, यांची घरे जाऊ देऊ नका. पण तरी यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणून या लोकांची घरं पाडली. म्हणून ठरविले की, आता लढा (108 Companies Scam) द्यायचा. मी सुनिल राऊत, संजय राऊत, वल्सा नायर, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भीक मागितल्याचं दमानिया यांनी म्हटलं आहे.
असीम गुप्ता यांना चुकीची ऑर्डर द्यायला भाग पाडलं, त्यांच्याविरोधात मी 11 पासून लढत आहे, असं देखील दमानिया यांनी स्पष्ट केलंय. प्रोजेक्ट नावाची कंपनी म्हैसकर नावाच्या कुटुंबाने बनवली आहे. या सगळ्या कंपन्यांना मुंबईच्या एन्ट्री पॉइंट्स तसेच नागपूर रिंग रोड बायपासची कामं मिळाली आहे. आता त्याचं कॅपिटल 750 कोटीपर्यंत गेलं आहे, 27 कोटींपासून त्यांनी सुरवात केली होती.निखिल नितीन गडकरी, हा या कंपनीसोबत असल्याचा आरोप देखील दमानिया यांनी केला आहे.
या कंपनीवर 3188 कोटी रुपयांचे कर्ज होते. बेला नावाच्या गावात यांनी दोन वीज निर्मीती करण्याचे कारखाने सुरू केले. त्यापैकी एक सुरू झाला आणि आणि दुसरा बुडाला. मानस ॲग्रो कंपनी काढली जाणार होती. ती सारंग नितिन गडकरी यांची होती. यांनी लोन घेतले कंपनी बुडाली दाखवली. आणि पांढरा पैसा लुटला. हे पैसे गडकरी कुटुंबाला मिळाल्याचा दावा देखील दमानिया यांनी केला आहे.
108 कंपन्या आणि 278 गुंतवणूकदार, अशी मी सिरीज करणार आहे. प्रत्येक कंपनीत काय काय घडले सांगेन, असंही अंजली दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
सारंग गडकरी यांनी कंपनी घेतली आणि ती कंपनी निखिलच्या कंपनीत घातली. त्यामुळे हे 29 अ चे उल्लंघन आहे. नितीन गडकरी आणि सारंग गडकरी यांनी ॲाफिस ॲाफ प्रॅाफीट केले आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहीजे. लोकांच्या डोक्यावर टोल थोपले. आयपीसी कायद्या अंतर्गत त्यांना जेल पाहीजे.
दोन्ही हातांनी त्यांचे मंत्री खात आहे. 128 कंपन्यांची डिटेल काढले आहे, वर्षभर चालेल इतकी सीरीज होईल. नितीन गडकरी यांचा पापाचा घडा भरला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. ईडीने मला समन्स पाठवावे, मला हे सगळे कागदपत्रं त्यांना द्यायचे आहेत, अशी विनंती अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.