Download App

धनंजय मुंडे अन् पंकजा मुंडे यांच्या राजकारणावर दमानियांचं मोठं विधान, वाचा नक्की काय म्हणाल्या?

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यांनी पुन्हा एकदा थेट टीका केली आहे.

  • Written By: Last Updated:

Anjali Damania on Dhananjay Munde : माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या (Damania) अंजली दमानिया यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. धनंजय मुंडे यांचं दहशतीचं राजकारण आता संपलंय. (Munde) असं ट्विट मी काल केलं आणि त्याचं कारण असं की बीडमध्ये पालकमंत्री अजित पवार गेले असताना तिथे धनंजय मुंडे कुठेही दिसले नाही हा पहिला मुद्दा अस दमानिया म्हणाल्यात.

त्याचबरोबर दमानिया यांनी भाषणात अजित पवार म्हणतात की, इथं कुणीही बड्या बापाचा बेटा असला तरीही त्याच्यावर कारवाई होईल. तिसरा डायलॉग त्यांचा की, आका असो काका असो सगळ्यांवर कारवाई होईल असं म्हटल्याचंही दमानिया यांनी म्हटलं आहे. तसंच, एकदा माफ केलं जाईल, दोनदा केलं जाईल तिसऱ्या चौथ्यांदा जर झालं तर चौथ्यांदा थेट त्यांच्यावर मकोका घालावा ह्या ज्या सगळ्या गोष्टी अजित पवार बोलल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

किड्या-मुंग्यांसारखी माणसं मारली, महादेव मुंडेंची फक्त 12 गुंठ्यासाठी; धसांनी सगळंच काढलं

राजाभाऊ मुंडे नावाच्या व्यक्तीला जे अजित पवार गटात घेतलं गेलं याचा अर्थ धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या कुटुंबाचं राजकारण आता संपलं, असं थेट मोठं विधान अंजली दमानिया यांनी केलं आहे. त्याचबरोबर आता वंजारी समाजाला जवळ ठेवण्यासाठी राजाभाऊ मुंडे यांना घेतलं गेलं, पण या सगळ्या बोलण्यावरून आपल्याला दिसतंय की आता धनंजय मुंडे यांना कुठंही थारा मिळणार नाही असंही दमानिया म्हणाल्या आहेत.

त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबतही विधान केलं. मी आज सकाळी बघितलं. सात वाजल्यापासून बातमी चालतीये की, संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा सहभाग मिळाला नाही ही बातमी आली कुठून? ते स्पष्टपणे अजित पवार धनंजय मुंडेंना बाजूला करतात म्हणूनच धनंजय मुंडेनी थेट कार्यकर्त्यांद्वारे ही पेरली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. सगळ्यांच्या डोक्यात धनंजय मुंडे संपला ही गोष्ट गेली नाही पाहिजे म्हणून ही बातमी पेरण्यात आली आहे असं माझं क्लिअर कट म्हणणं आहे असंही त्या म्हणाल्यात.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल बोलताना दमानिया म्हणाल्या की, जनभावनामुळे घेतला गेला याच्यात काहीच दुमत नाही. कारण संतोष देशमुख यांचे जेव्हा फोटो बाहेर आले त्याच्यातली क्रुरता बाहेर आली आणि ती क्रुरता करणारा कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा होता म्हणूनच त्यांचा राजीनामा घेतला गेला. वरून दबाव होता की नव्हता त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. जनभावना जी होती ती ही होती आणि त्यासाठी त्यांचा राजीनामा घेतला गेला असंही त्या म्हणाल्या आहेत.

follow us