‘लाडकी बहीण’साठी सरकारचा आटापिटा; ‘या’ सरकारी योजना बंद होण्याच्या मार्गावर?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी योजना बंद होणार असल्याचे समजते.

Ladki Bahin Yojana (4)

Ladki Bahin Yojana (4)

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Scheme : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेत राज्यातील महिलांच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जात आहेत. आता या योजनेबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेवर दर महिन्याला हजारो कोटी रुपयांचा खर्च होत आहे. यासाठी राज्य सरकारला कर्ज घ्यावे लागते की काय अशी परिस्थिती आहे. तर दुसरीकडे अन्य सरकारी योजनांवर याचा प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता सरकार अन्य योजनांना कात्री लावण्याच्या तयारीत आहे. आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी योजना बंद होणार असल्याचे समजते.

धक्कादायक! यूपी, बंगाली महिलांच्या खात्यात लाडकी बहीणचे पैसे; बोगस लाभार्थ्यांचं रॅकेट

राज्यात लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचा लाभ राज्यातील कोट्यावधी महिलांना नियमितपणे मिळत आहे. परंतु, या महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यासाठी राज्य सरकारला मोठी कसरत करावी लागत आहे. वर्षाकाठी तब्बल 50 हजार कोटी रुपयांची व्यवस्था करावी लागत आहे. इतका मोठा निधी एकाच योजनेसाठी द्यावा लागत असल्याने राज्याची आर्थिक घडी विस्कटण्यास सुरुवात झाली आहे.

या स्थितीचा परिणाम अन्य सरकारी योजनांवर होऊ लागला आहे. या योजनांसाठी निधीची तजवीज करताना सरकारी यंत्रणांची दमछाक होऊ लागली आहे. त्यामुळे या योजनांचे भवितव्य संकटात सापडले आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी अन्य सरकारी योजनांना कात्री लावली जाणार असल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी या योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

आनंदाचा शिधा, शिवभोजन संकटात..

राज्यातील जनतेची दिवाळी गोड व्हावी यासाठी दरवर्षी 100 रुपयांच्या आनंदाच्या शिधाची किट दिली जाते. परंतु, सध्याच्या परिस्थितीत लाडकी बहीण या एकाच योजनेवर हजारो कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे आता दिवाळी गोड कशी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. लाडक्या बहि‍णींच्या खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा होतात.

असरचा धक्कादायक अहवाल; राज्यातील तिसरी ते पाचवीच्या ५०% विद्यार्थ्यांना वाचताही येईना

परंतु, यासाठी सरकारला दरमहा 4 हजार कोटी रुपयांची तजवीज करावी लागत आहे. आनंदाच्या शिधा योजनेत राज्यातील गरीब कुटुंबांना एक किलो रवा, एक किलो चना डाळ, एक किलो साखर आणि एक लीटर पामतेल वर्षातून एकदा दिवाळीच्या वेळी दिले जाते. तसेच शिवभोजन थाळीच्या माध्यमातून फक्त दहा रुपयांत जेवण दिले जाते.

शिवभोजन थाळीत दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी भात आणि एक वाटी वरण दिले जाते. अर्थात या योजनेलाही राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही योजना सुरू करण्यात आली होती. महायुती सरकारनेही ही योजना सुरू ठेवली आहे. परंतु, लाडकी बहीणमुळे या योजनेवरही संकटाचे ढग जमा झाले आहेत. त्यामुळे ही योजनाही बंद होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अद्याप खात्रीशीर माहिती नाही. सरकारनेही अजून असा काहीही निर्णय घेतलेला नाही.

Exit mobile version