Beed Crime : बीडमध्ये पुन्हा एकदा एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. (Beed) बीड तालुक्यातील आहेर वडगावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेने बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यातील आहेर वडगावात एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. आहेर वडगावात मंदिरातच तरुणाला मारहाण झाली आहे. तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तरुणाला मारहाण करण्याचा प्रकार हा २७ मे रोजी घडला. मात्र, त्या दिवसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेने बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पावसाचा जोर कायम राहणार; मराठवाडा, कोकण, पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस; ऑरेंज अलर्ट जारी
बीडमध्ये मारहाण झालेल्या या तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भीमा राजाराम रोहिटे असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे. यासंदर्भात आशाबाई राजाराम रोहिटे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ दिसत आहे की, बीडच्या आहेर वडगावमध्ये तरुणाला मंदिरातच मारहाण करत असल्याचे दिसत आहे.
गावातील काही लोक या तरुणाला मारहाण करत आहेत. काठीलाठीने या तरुणाला मारहाण केली जात आहे. काही लोक तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. गावातील लोक तरुणाला का मारहाण करत आहे, याची कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, तरुणाला मारहाणीच्या घटनेने बीडमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे.