बारामतीत पुन्हा विमान कोसळले; आठ महिन्यांत तिसरी दुर्घटना, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Baramati Aircraft Crash तसेच विमानातील पायलट किंवा अन्य व्यक्ती जखमी झाली आहे का, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

Baramati Aircraft Crash

Baramati Aircraft Crash

Another Aircraft Crash Reported in Baramati: पुणे जिल्ह्यातील बारामती (Baramati) विमानतळावर पुन्हा एकदा विमान दुर्घटनेची (Aircraft Crash) घटना समोर आली आहे. विमानतळ परिसरात VT-SEX हे शिकाऊ विमान कोसळल्याची माहिती आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विमानातील पायलट कॅप्टन चिराग शशिकांत दोईफोडे आणि कॅडेट अभिजीत जुंदरे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

145 प्रवासी घेऊन जाणाऱ्या Air India फ्लाइटचा पायलट नशेत? टर्ब्युलन्समुळे 17 जण रुग्णालयात दाखल

बारामती विमानतळावर यापूर्वीही विमान दुर्घटनांच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या ताज्या घटनेनंतर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था आणि प्रशिक्षण विमानांच्या उड्डाणांबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

नेमका कसा झाला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती एअरफिल्डवरील 29/11 क्रमांकाच्या रनवेवर ही घटना घडली. विमानाचे प्रभारी वैमानिक (PIC) कॅप्टन चिराग शशिकांत दोईफोडे होते, तर कॅडेट म्हणून अभिजीत जुंदरे विमानात होते.

प्रशिक्षणादरम्यान नेमकं काय घडलं?

विमानाने ‘सर्किट अँड लँडिंग इमर्जन्सीज’ या प्रशिक्षण सरावासाठी विमानाने दुपारी 12:09 वाजता धावपट्टीकडे जाण्यास सुरुवात केली.  सुरुवातीला विमानाने  लिंक ब्राव्हो मार्गे रनवेवर प्रवेश केला. त्यानंतर रनवे 29 च्या थ्रेशोल्डवर विमान लाइन-अप करण्यात आले आणि रिजेक्टेड (Rejected Take-Off) म्हणजेच टेक-ऑफ रद्द करण्याचा सराव करण्यात आला. यानंतर विमानाला रनवे 11 च्या थ्रेशोल्डवर पुन्हा लाइन-अप करण्यात आले. तेथेही आणखी एक रिजेक्टेड टेक-ऑफ सराव करण्यात आला.

विमान रनवेबाहेर कसे गेले?

प्रशिक्षण सरावादरम्यान विमानाला रनवेवर पूर्णपणे थांबवता आले नाही. त्यामुळे विमान रनवे 29 च्या थ्रेशोल्डच्या पुढे गेले. त्यानंतर विमानाने रनवेच्या विस्तारित पक्क्या पृष्ठभागाच्या उजव्या बाजूला वळत रनवेबाहेर प्रवेश केला. या घटनेला विमानाचा रनवे एक्स्कर्शन (Runway Excursion) असे म्हटले जाते.

आठ महिन्यांत तिसरी विमान दुर्घटना

बारामती परिसरात यापूर्वी याच वर्षात दोन विमान दुर्घटना घडल्या आहेत. जानेवारी 2026 मध्ये व्हीएसआर व्हेंचर्सचे चार्टर विमान बारामती विमानतळावर दुर्घटनाग्रस्त झाले होते. या भीषण अपघातात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर बारामती विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर मे महिन्यात गोजुबावी गावाच्या हद्दीत आणखी एका शिकाऊ विमानाचा अपघात झाला. प्रशिक्षणादरम्यान विमानाला तांत्रिक अडचण आल्याने त्याचे हार्ड लँडिंग झाले होते. या घटनेत पायलट सुरक्षित बचावला होता. आता पुन्हा शिकाऊ विमान दुर्घटनेची घटना समोर आल्याने बारामतीतील विमान प्रशिक्षण आणि विमानतळाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

सहा खासदारांशी मोदींची भेट; “ मोदींनी केटरिंग सर्व्हिस सुरू केली” संजय राऊतांचा हल्लाबोल!

विमानतळाच्या सुरक्षेवर आधीपासूनच प्रश्न

बारामती विमानतळाबाबतच्या एका अधिकृत प्राथमिक तपास अहवालात रनवेवरील मार्किंग फिकट झाल्याचे, रनवेवर सैल खडी असल्याचे तसेच विमानतळावर स्वतंत्र विमान बचाव आणि अग्निशमन यंत्रणा (Aircraft Rescue and Fire Fighting) उपलब्ध नसल्याचे नमूद करण्यात आले होते. विमानतळावर स्वतंत्र हवामानविषयक सुविधा नसल्याचाही अहवालात उल्लेख आहे. त्यामुळे वारंवार घडणाऱ्या विमान दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर बारामती विमानतळावरील सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि प्रशिक्षण उड्डाणांच्या नियमनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

… तर यशस्वी जैस्वालवर 4 सामन्यांची बंदी; रहाणेने केला सर्वात मोठा खुलासा

दरम्यान, आताच्या विमान दुर्घटनेतील व्यक्तींना कोणतीही दुखापत झालेली नाही, अशी माहीती समोर आलेली आहे.

Exit mobile version