API Ashwini Bidre Murder : एपीआय अश्विनी बिद्रे हत्याकांड (API Ashwini Bidre Murder) प्रकरणी आज पनवेल सत्र न्यायालयात आज सुनावणी पार पडली. या हत्याकांडामध्ये पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर (Abhay Kurundkar) हेच मुख्य दोषी असल्याचं निष्पन्न झालं असून पीआय अभय कुरुंदकरसह महेश फळणीकर आणि कुंदन भंडारीला शिक्षा सुनावण्यात येणार होती, मात्र आता ही शिक्षा लांबवणीवर गेलीयं. अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी 21 एप्रिलला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी आजतागायत आम्हाला कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं नसल्याचा आरोप एपीआय अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी केलायं. हत्याकांडानंतर एबीपी माझा या वृत्तसंस्थेने आम्हाला सहकार्य केलं असून या वृत्तसंस्थेचे राजू गोरे यांनी आभारही मानले असल्याचं समोर आलंय.
मुंबईत एपीआय अश्विनी बिद्रे 11 एप्रिल 2016 रोजी गायब झाल्याची घटना घडली. त्यानंतर त्यांची हत्या झाल्याचं समोर आलं होतं. ज्या दिवशी अश्विनी बिद्रे गायब झाल्या त्या दिवशी बिद्रे पीआय अभय कुरुंदकरला भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी भाईंदरला जात असतानाच कारमध्ये बिद्रे यांचा कुरुंदकर यांनी गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केलायं. कुरुंदकर यांनी बिद्रे यांचा गळा दाबल्याने त्यांचा मृत्यू झाला.
‘विरोध करू नका…फुले चित्रपट लवकर प्रदर्शित होऊ द्या’; छगन भुजबळांची हात जोडून विनंती
या हत्येनंतर कुरुंदकर यांनी अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी लाकड कापण्याच्या कटरने मृतदेहाचे तुकडे करुन वसईच्या
खाडीत फेतून दिले. बिद्रे यांच्या हत्येनंतर पोलिसांच्या तपासामध्ये त्यांच्या मृतदेहाचे अवशेष सापडले. तेव्हापासून या प्रकरणाचा उलगडा होत आहे.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताच हत्येत पीआय अभय कुरुंदकर यांचा सहभाग असल्याचं समोर आलं. पनवेल सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान, अभय कुरुंदकर हेच दोषी असल्याचं आढळून आल्याने न्यायालयाने अभय कुरुंदकर यांना मुख्य दोषी ठरवलं. तसेच हत्येत सहभागी असलेल्या महेश फळणीकर, कुंदन भंडारी यांनाही न्यायालयाने दोषी ठरवलंय. तर कुरुंदकर यांचा वाहनचालक राजेश पाटीलला मात्र न्यायालयाने दिलासा दिला असून पुराव्या अभावी त्याची निर्दोष मुक्तता केलीयं.