Download App

आता डिजिटल पद्धतीने सेवा मिळणार; ग्रामपंचायतीत ‘आपले सरकार सेवा केंद्र’

राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरु होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीयं.

Pune News : ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्याच निर्णय ग्रामविकास विभागाकडून घेण्यात आलायं. त्यामुळे आता गावगाड्यातील लोकांना ग्रामपंचायतीमधूनच आपले सरकार सेवा केंद्राचा लाभ मिळणार आहे. पुणे जिल्ह्यात 1062 केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. लोकांना आता डिजिटल पद्धतीने सेवा मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

काका, नातवासाठीच्या टेस्लारूपी खेळण्यासाठी पैसे कुठून आले? राजकारण्यांसह सरनाईंकांना अस्ताद काळेची टोलेबाजी

लोकांना हवं असलेल्या सेवा आता आपले सरकार सेवा केंद्रामध्ये मिळणार आहेत. या केंद्रामधून सेवा आणि योजनांचा लोकांना लाभ मिळणार असून 200 सेवा आणि योजना जानेवारीपर्यंत येतील. समग्र नावाच्या संस्थेसोबत नवा करार करण्यात आला असून एखाद्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करायचा असेल तर ते चारही टप्पे लोकांना पाहता येणार आहेत. लोकांना ऑफिसमध्ये येण्याची गरज भासणार नाही
व्हॉट्सअपवररही ही सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

ग्रामपंचायत पातळीवरील आपले सरकार सेवा केंद्र हे अधिकृतरीत्या स्वीकृत करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील 1087 ग्रामपंचायतींसाठी युजर आयडी व पासवर्ड मिळविण्यासाठी जिल्हा परिषदे मार्फत महाआयटीला माहिती देण्यात आली होती. जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या प्रयत्नातून आतापर्यंत 1014 ग्रामपंचायतींना युजर आयडी व पासवर्ड प्राप्त झाले आहेत.

समृद्धी महामार्गाला खिळे ठोकले…एमएसआरडीसीने काय उत्तर दिलं?

सदर आयडी व पासवर्ड मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत अधिकारी व केंद्रचालक यांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये सेवा केंद्र सुरू करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.


दरम्यान, तालुका पातळीवर हँड्स-ऑन ट्रेनिंगचे आयोजन करण्यात येणार आहे. लवकरच ग्रामपंचायत पातळीवर सेवा केंद्र सुरू झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना विविध सेवांचा दिलासा एका ठिकाणी मिळणार असून ग्रामपंचायतींच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.

follow us