APMC Election : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होत आहे. नुकत्याच आलेल्या निकालानुसार बारामतीचा गड राष्ट्रवादीने राखला आहे. सध्या चालू असलेल्या मतमोजणीनुसार राष्ट्रवादीचे १८ उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे सर्वच जागा जिंकत राष्ट्रवादीने भाजपला धक्का दिला आहे. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे, यावेळी अजित पवारांनी मतदारांचे आभार मानले.
पारनेरमध्ये Sujay Vikhe गटाचा धुव्वा, लंके-औटी गटाने सर्व जागा जिंकल्या
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की शेतकरी वर्गाने चांगला कौल आम्हाला दिला आहे, आमच्या कार्यकर्त्यानी चांगली मेहनत घेतली आहे. मतदारांनी देखील त्यांचं काम योग्य प्रकारे बजावलं. उमेदवारांनी देखील त्यांच्यापर्यंत पोहचुन भूमिका मांडली,असाच कौल बारामतीकर देत असतात.
या निवडणुकींनंतर संपूर्ण नवीन टीम आली आहे, पुर्वाश्रमीमीचे फक्त दोनच जणांना पक्षाने उमेदवारी दिली होती. बाकी सगळे नवीन आहेत, सगळे मिळून शेतकऱ्यांच्या विश्वास टाकला आहे, त्याला ते न्याय देतील. आणि मतदारांचे विशेष आभार त्यांनी यावेळी मानले.
कर्जत बाजार समितीत रोहित पवार-राम शिंदेंना बरोबरीत जागा, आता फेर मतमोजणी