Download App

MHADA, CIDCO वा अन्य सरकारी योजनेत घरासाठी ‘दुसऱ्यांदा अर्ज’ करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

Applying for second time in MHADA, CIDCO scheme : अनेकदा म्हाडा, सिडको त्याचबरोबर इतर सरकारी योजनांमध्ये पहिलं घर मिळालेलं असताना लोक दुसऱ्यांदा घरासाठी अर्ज करतात. मात्र आता अशाप्रकारे सरकारी योजनांमधील घरांसाठी एक घर मिळालेलं असताना अर्ज करता येणार नाही.

MHADA Lottery 2023 Mumbai तारीख जाहीर, 4 हजार 83 घरांसाठी निघणार सोडत

म्हणजे तुम्ही आता सरकारी योजनांमधील घरांचे एकदाच लाभार्थी होऊ शकणार आहात. जर तुम्ही लाभार्थी असताना दुसऱ्यांदा सरकारी योजनांमधील घरांसाठी अर्ज केल्यास आणि तुम्ही त्यात लाभार्थी ठरल्यास तुमच्यावर कडक कारवाई होणार आहे. सोडतीत मिळालेल्या घराचं वितरण रद्द करण्यात येणार आहे.

कर्नाटकात दाखवून दिलं, आता महाराष्ट्रातही तेच घडेल; अजितदादांनी सरकारला सुनावलं

यासंदर्भातील राज्य सरकारच्या 2019 च्या आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्याचं म्हाडाने ठरवलं आहे. यासंबंधीचा शासन निर्णय 11 सप्टेंबर 2019 रोजी जारी करण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी प्रभावीपणे झालेली नव्हती. आता मात्र या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

दरम्यान मुंबईतील म्हडाच्या घरांच्या सोडतीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यावेळी मुंबईत म्हडाच्या 4 हजार 83 घरांसाठी सोडत निघणार आहे. यासाठी 22 मे ला जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर 22 मे ते 26 जूनपर्यंत म्हडाच्या घरांसाठी नोंदणी, अर्ज विक्री-स्वकृती प्रक्रिया सुरू राहणार आहे. 18 जुलैला म्हाडाच्या ( MHADA ) मुंबई मंडळाच्या घरांची सोडत जाहीर होणार आहे. वांद्रे पश्चिन येथील रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार आहे.

Tags

follow us