MHADA Lottery 2023 Mumbai तारीख जाहीर, 4 हजार 83 घरांसाठी निघणार सोडत

MHADA Lottery 2023 Mumbai तारीख जाहीर,  4 हजार 83 घरांसाठी निघणार सोडत

MHADA Lottery 2023 Mumbai : गेल्या कित्येक दिवसांपासून म्हाडाच्या ( MHADA ) मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची अनेकांकडून वाट बघितली जात होती. मात्र आता ही प्रतिक्षा अखेर संपली आहे.मुंबईतील म्हडाच्या घरांच्या सोडतीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यावेळी मुंबईत म्हडाच्या 4 हजार 83 घरांसाठी सोडत निघणार आहे.

शिंदेंच्याऐवजी बावनकुळेंनी घेतली विखेंची बाजू; म्हणाले, त्यांचे आरोप गैरसमजातून

यासाठी 22 मे ला जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर 22 मे ते 26 जूनपर्यंत म्हडाच्या घरांसाठी नोंदणी, अर्ज विक्री-स्वकृती प्रक्रिया सुरू राहणार आहे. 18 जुलैला म्हाडाच्या ( MHADA ) मुंबई मंडळाच्या घरांची सोडत जाहीर होणार आहे. वांद्रे पश्चिन येथील रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार आहे.

11th Admission ऑनलाईन प्रक्रिया कधी सुरू होणार? जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक

कोणत्या भागात असणार म्हडाची घरं?

म्हाडाची ही घरं मुंबईतील गोरेगाव पहाडी, विक्रोळीच्या कन्नमवारनगर, अँटॉप हिल, बोरिवली, मालाड, दादर, सायन परळ, ताडदेव या भागांमध्ये असणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या सोडतीची चर्चा सुरू होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ही सोडत लांबणीवर पडली होती. या अगोगर 2019 मध्ये म्हाडाच्या ( MHADA ) मुंबई मंडळाच्या घरांची सोडत जाहीर झाली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube