11th Admission ऑनलाईन प्रक्रिया कधी सुरू होणार? जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक
11th Admission Online process timetable : नुकतचं दहावीच्या सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आता 11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार 25 मे पासून 11 वीच्या ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे.
Karnataka CM News : सिद्धारामय्या ठरले ‘किंग’; शिवकुमारांच्या हातून तेलही गेलं अन् तुपही गेलं
दरम्यान राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचा दहावीचा निकाल लागणे अद्याप बाकी आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया अर्जाचा भाग एक भरावा लागणार आहे. तर दहावी बोर्डाचा निकाल लागल्यानंतर कॉलेज पसंती क्रमांक देऊन या अर्जाचा दुसरा भाग विद्यर्थ्यांना भरता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी येत्या 20 ते 24 मे या कालावधीत प्रवेश अर्ज भरण्याचा सराव करू शकतात.
9 Years of Modi Government : ऐतिहासिक कार्यकाळातील 9 वादळी निर्णयांचा आढावा
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे 2017-18 पासून राज्यातील विविध विभागानुसार 11 वी चे प्रवेळ ऑनलाईन पद्धतीने केले जातात. यावर्षी देखील ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच पार पडणार आहे. दरम्यान तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडथळे येतात. यासाठी विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे गरजेचे असते.
Sanjay Raut : जे.पी. नड्डांचा मुंबईशी काय संबंध? उगाच लुडबुड करु नये
जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक…
20 ते 24 मे दरम्यान प्रवेश प्रक्रिया अर्जाचा भाग एक भरण्याचा सराव
25 मे सकाळी 11 पासून दहावी बोर्डाचा निकाल जाहीर होईपर्यंत प्रवेश प्रक्रिया अर्जाचा भाग एक भरता येणार
संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करावी
प्रवेश प्रक्रिया अर्जाचा भाग एक भरूण व्हेरीफाय करावे
दहावी बोर्डाचा निकालानंतर अर्जाचा दुसरा भाग विद्यर्थ्यांना भरता येणार
त्यानंतर कॉलेज पसंती क्रमांक देऊन माहीती भरावी
दहा ते पंधरा दिवसात पहिली प्रवेश फेरी पूर्ण करून विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया होईल
त्यानंतर शिक्षण विभाग प्रवेश प्रक्रियेची दुसरी, तिसरी आणि विशेष फेरीचं नियोजन करेल.