IAS Tukaram Mundhe: धडकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे (IAS Tukaram Mundhe) यांची 21 वर्षात 25 वेळा बदल्या झाल्या आहेत. आता त्यांची अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून नियुक्ती झालीय. पण त्यांची पंढरपूर कॉरिडॉर (Pandharpur Corridor) अंमलबजावणी करण्यासाठी विशेष अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्याची मागणी झाली आहे. पंढरपूर येथील कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठानचे अमरजीत राजाराम पाटील (Amarjeet Rajaram Patil) यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे.
तिसऱ्यांदा वाढले पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले; वाचा, राज्यात कुठं कुठं पंप बंद?
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाचे दूरगामी नियोजन म्हणून आपण पंढरपूर शहरात कॉरिडॉरची अंमलबजावणी करणार आहात. सदर कॉरिडॉरचे काम तीस महिन्यामध्ये पूर्णत्वाकडे घेवून जाण्याचा आपला मानस आहे. पंढरपूर कॉरिडॉरमुळे पंढरपूर शहराचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलून जाणार आहे. परंतु हे सर्व होत असताना दोन बाबींची पूर्तता होणे अत्यंत आवश्यक असल्याचे अमरजीत पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.
थायलंडचा भारतीयांना दणका ! व्हिसा-फ्री प्रवेश बंद; आता ‘व्हिसा ऑन अरायव्हल’साठी शुल्क भरावे लागणार
यातील पहिली बाब म्हणजे कॉरिडॉरमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांचे योग्य ते पुन:र्वसन होणे ही आवश्यक आहे. तसेच पंढरपूर कॉरिडॉरमधील सर्वच कामे दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी भ्रष्टाचार विरहित होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास आपल्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला गालबोट लागण्याची शक्यता अधिक आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने याआधी पंढरपूर शहरासाठी कोट्यवधीचा निधी वेळोवेळी देण्यात आलेला आहे. परंतु, सदर निधीमधून करण्यात आलेली कामे पाहता सदर कोट्यवधीचा निधी वाया गेल्याचे आज पंढरपूरची अवस्था पाहिल्यावर दिसून येते. आपला ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या कॉरिडॉरबाबत ही अशीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पंढरपूर कॉरिडॉरची काटेकोर आणि गुणवत्ता पूर्ण अंमलबजावणी होण्यासाठी, पंढरपूर शहरात या पूर्वी श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास, ६५ एकर परिसरात विकसित करणारे व पंढरपुरातील विकास कामांचा अनुभव असणारे तुकाराम मुंढे यांची कॉरिडॉर अंमलबजावणी विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी अमरजीत पाटील यांनी केलीय.
