भाविकांसाठी आनंदाची बातमी! 2 जूनपासून विठूरायाचे पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरु होणार

भाविकांसाठी आनंदाची बातमी! 2 जूनपासून विठूरायाचे पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरु होणार

Pandharpur Vitthal Rukmini Mandir News : पंढरपूरच्या विठ्ठल – रुक्मिणी (Pandharpur Vitthal Rukmini ) मातेच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची विठ्ठलभक्तांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन २ जूनपासून सुरु होणार असल्याची माहिती विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दिली आहे. आज झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुस्लिमांवरून फक्त प्रचार! वाचा, उमेदवारांची संख्या किती? अन् कोणत्या पक्षाने दिली संधी 

या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी माता मंदिरात संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम सुरू होते. त्यामुळं 15 मार्चपासून पदस्पर्श दर्शन बंद होते. आता आषाढी वारीची चाहूल लागल्याने मंदिरातातील पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.

मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आज मंदिर समितीच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विठ्ठल आणि रुक्मिणीच्या गाभाऱ्यातील काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर येत्या 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरू होणार असल्याचे, गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे घाबरट, पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच निराधार आरोप; शेलारांचे टीकास्त्र 

संरक्षण आणि सुशोभिकरणाच्या कामासाठी विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन 15 मार्चपासून बंद करण्यात आले होते. आता मंदिराचे सुमारे 70 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित 30 टक्के कामासाठी अवधी लागणार आहे. मात्र आता आषाढी वारीनिमित्त मंदिरात पुन्हा पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आले. तसेच आषाढी यात्रेच्या निमित्तानेही 7 जुलैपासून 24 तास देवाचे दर्शन सुरू राहणार आहे,असंही या बैठकीत सांगण्यात आलं

मंदिराचे काम पूर्णत्वाकडे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या सहकाऱ्याने मंदिराच्या कामासाठी निधी मिळाला आहे. त्यामुळे मंदिराचे काम वेगाने सुरू असून ते पूर्णत्वाकडे आले आहे. महिनाअखेरीस हे काम पूर्ण होईल. यानंतर २ जूनपासून मंदिर भाविकांना पदस्पर्श दर्शनासाठी मंदिर खुले होणार आहे, असं गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube