Kartiki Ekadashi : पंढरपूरसाठी नवं काय? फडणवीसांनी केली मोठी घोषणा

Kartiki Ekadashi : पंढरपूरसाठी नवं काय? फडणवीसांनी केली मोठी घोषणा

Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय (Kartiki Ekadashi) महापूजा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. राज्यातील सर्व समाजघटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती आणि आशीर्वाद दे, असे साकडे देवेंद्र फडणवीस यांनी पांडुरंगा चरणी घातले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र धर्म वारकऱ्यांनी जिवंत ठेवला. विकास आराखडा आपण तयार केला आहे. आधी मंदिर संवर्धनाचं काम केलं पाहिजे अशी आमची भूमिका होती. त्यानुसार 75 कोटींच्या कामांचे भूमिपूजन आज झालं आहे. पुरातत्व विभागाला माझं सांगणं आहे की कोट्यावधी लोकांच्या भावना यासोबत जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे हे काम उत्तम आणि लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे. पंढरपूर विकास आराखड्याचे काम आपल्याला सर्वांना सोबत घेऊन करायचे आहे.

बा विठ्ठला.. सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती दे : महापुजेवेळी फडणवीसांचे साकडे

इंद्रायणी नदी स्वच्छ आणि अविरत वाहती राहिली पाहिजे यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. इंद्रायणी नदीत सोडले जाणारे पाणी स्वच्छ करूनच सोडले गेले पाहिजे यासाठी प्रयत्न आहेत. या कामासाठी थोडा वेळ लागणार आहे. मागील वर्षी कार्तिकी एकादशीला विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिवार देवता संवर्धनाची संकल्पना मांडली होती. यावर्षी मंदिराच्या संवर्धनासाठी मंजूर आलेल्या 73 कोटींपैकी पहिल्या टप्प्यातील 26 कोटींच्या विविध संवर्धन विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले, त्याबद्दल समाधान वाटत आहे. मात्र हे काम अत्यंत वेगाने आणि उत्कृष्ट दर्जाचे होईल यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा आणि संबंधित ठेकेदार यांनी काळजी घेतली पाहिजे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube