उद्धव ठाकरे घाबरट, पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच निराधार आरोप; शेलारांचे टीकास्त्र

उद्धव ठाकरे घाबरट, पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच निराधार आरोप; शेलारांचे टीकास्त्र

Ashish Shelar On Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha elections) राज्यातील चार टप्पे पार पडले आहेत. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांकडून काही मतदारसंघात पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) देखील काही मतदारंसघात मतदारांच्या बोटाला आधीच शाई लावली जाते, असा आरोप केला. त्या आरोपाला आता भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

पाकिस्तानात लेटर पॉलिटिक्स! इम्रान खान सेनाप्रमुखांना धाडणार पत्र; सरकारचं वाढलं टेन्शन 

आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंसारखा निवडणुकीला घाबरणारा दुसरा घाबरट माणूस मी पाहिला नाही. आधी त्यांनी ईव्हीएम मशीनच्या नावाने बोंबा ठोकल्या. ईव्हीएम मशीनच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेले. तो विषय संपत नाही, तोच ज्या भागात निवडणुका झाल्या आहेत, तिथल्या मतांच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उभं केलं. आता बोटाच्या शाईवरून आरोप करायला लागले. आपला निवडणुकीतला पराभव स्पष्ट दिसत असल्याने उद्धव ठाकरे निराधार विधानं करत आहे. निराधार आरोप करणं हा पळपुटेपणा आहे, अशी टीका शेलार यांनी केली.

Ahmednagar Crime : नगर हादरलं ! तरुणाच्या शरीराचे तुकडे करून कालव्यात फेकले 

शिवसैनिकांवर हात उचणाऱ्या पोलिसांचं काय करायचं हे मी सत्ता आल्यावर पाहून घेईल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता. त्यावर बोलतांना शेलार म्हणाले की, बघुन घेईल म्हणजे काय? उद्धव ठाकरेंना ही दडपशाहीची भाषा शोभत नाही. उद्धव ठाकरेंची भाषा म्हणजे, चोर मचाये शोर, अशी टीका शेलारांनी केली.

मोदीजी उद्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही नकली म्हणतील. आता आरएसएसलाही धोका आहे. भाजप आरएसएसवरही बंदी आणेल, असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. त्याविषयी विचारलं असता शेलार म्हणाले की, मला वाटतं की, उद्धव ठाकरे नुसते भ्रम पसरण्याचं काम करत आहे. आम्ही सगळ्या संस्था वैचारिक दृष्ट्या एक आहोत. मात्र आमची कार्यपद्धती वेगळी आहे. आमचं रुप विश्वरूप दर्शनासारखं आहे. त्यामुळं काहींच्य डोक्यावर परिमाण झाला आहे, असा खोचक टोला शेलारांनी लगावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज