पाकिस्तानात लेटर पॉलिटिक्स! इम्रान खान सेनाप्रमुखांना धाडणार पत्र; सरकारचं वाढलं टेन्शन

पाकिस्तानात लेटर पॉलिटिक्स! इम्रान खान सेनाप्रमुखांना धाडणार पत्र; सरकारचं वाढलं टेन्शन

Pakistan Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान सध्या (Imran Khan) तुरुंगात आहेत. या तुरुंगातूनच त्यांनी मोठी घोषणा केली आहे. पाकिस्तानी सेनेचे प्रमुख जनरल असीम मुनीर यांना लवकरच एक पत्र लिहिणार असल्याची घोषणा खान यांनी केली आहे. डॉनमधील रिपोर्टनुसार, देशातील सध्याच्या मुद्द्यांवर पत्र लिहिण्याची इच्छा इमरान खान यांनी व्यक्त (Pakistan) केली आहे. पीओकेत काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. या ठिकाणी झालेल्या हिंसाचारात तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता. देशात नेमकं काय घडत आहे. देश नेमका कुठं चाललाय या गोष्टी पत्रातून मांडणार असल्याचे इम्रान खान यांनी सांगितले.

डॉन वृत्तपत्रातील रिपोर्टनुसार, इम्रान खान म्हणाले, की सेना महत्वाची संस्था आहे. या संस्थेला कधीही लोकांविरुद्ध उभी करू नये. खोटेपणाचं संरक्षण करण्यासाठी देशातील न्यायपालिका आणि मीडियावर दबाव टाकला जात आहे. राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि पंजाबचे मुख्यमंत्री याच खोट्या व्यवस्थेचे प्रतिनिधी आहेत. ज्यांना धोकेबाजीमुळे जागा मिळाल्या आहेत. त्यांच्याकडे कोणतेच अधिकार नाहीत.

Pakistan : पाकिस्तान सरकारला धक्का! जुन्या मित्राने नाकारली मोठी ऑफर?

इम्रान खान यांनी यावेळी फॉर्म ४५ चा उल्लेख केला. हा फॉर्म पाकिस्तानातील निवडणुकीत अतिशय महत्वाचा आहे. या अर्जात मतदान केंद्रावरील मतांची संख्या असते. यामध्ये मतदान केंद्रांची संख्या, मतदारसंघाचे नाव, एकूण मतदार, किती मतदान झाले, कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली या महत्वाच्या गोष्टींची माहिती असते. हा अर्ज राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत भरला जातो. यानंतर फॉर्म ४७ च्या माध्यमातून निवडणूक निकाल जाहीर केला जातो. इम्रान खान यांच्या समर्थकांचा आरोप आहे की फॉर्म ४५ पर्यंत ते जिंकत होते. नंतर मात्र फॉर्म ४७ मध्ये रिटर्निंग अधिकाऱ्यांनी बेईमानी केली.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज