Imran Khan यांना मोठा धक्का, आयोगाने निवडणूक लढवण्यास ठरवलं अपात्र

  • Written By: Published:
Imran Khan यांना मोठा धक्का, आयोगाने निवडणूक लढवण्यास ठरवलं अपात्र

Imran Khan Nomination Rejected : माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे संस्थापक इम्रान खान (Imran Khan) हे 2024 मध्ये पाकिस्तानमध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुका लढवू शकणार नाहीत. कारण, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (Election Commission of Pakistan) त्यांचा अर्ज फेटाळला आहे. इम्रान खान यांच्यासाठी हा निर्णय मोठा धक्का मानला जात आहे.

चुम्मा-चुम्मा पुरस्काराचे मानकरी कोण हे…;रोहिणी खडसेंकडून शीतल म्हात्रेंचा खास शैलीत समाचार ! 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, इम्रान खान यांनी 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आगामी निवडणुक लढण्यासाठी दोन अर्ज दाखल केले होते. त्यांनी पाकिस्तानी पंजाबची राजधानी लाहोरच्या NA-122 आणि त्यांचे मूळ गाव मियांवलीच्या NA-89 मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आयोगाने इम्रान खान यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे. इम्रान यांच्याशिवाय पीटीआयचे उपाध्यक्ष आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी, त्यांच्या पक्षाचे नेते आझम स्वाती आणि झुल्फी बुखारी यांचेही उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आले आहेत.

टीम इंडियाचे 2024 मध्ये व्यस्त वेळापत्रक; वर्ल्ड कप, आयपीएलसह ‘या’ संघांसोबत होणार सीरिज

71 वर्षीय इम्रान खान एप्रिल 2022 मध्ये पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यापासून राजकीय आणि कायदेशीर लढाईत अडकले आहेत. पंतप्रधान असताना सरकारी भेटवस्तूंची बेकायदेशीरपणे विक्री केल्याप्रकरणी त्यांना ऑगस्टमध्ये तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हापासून ते सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत.

अपात्र घोषित करूनही अर्ज दाखल

इम्रान खानच्या मीडिया टीमने सांगितले की, खान यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरल्यामुळे 8 फेब्रुवारीच्या सार्वत्रिक निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले होते, परंतु तरीही त्यांनी शुक्रवारी (डिसेंबर 29) उमेदवारी अर्ज दाखल केला.

दरम्यान, आता निवडणुक आयोगाने त्यांचा अर्ज फेटाळला आहे. लाहोरमधील अर्ज नाकारल्यावर पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने म्हटलं की, इम्रान खान यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. कारण ते मतदारसंघात मतदार नोंदणीकृत नव्हते आणि न्यायालयाने त्यांना दोषी आणि अपात्र घोषित केले. इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पीटीआयचे अनेक प्रमुख नेते सध्या तुरुंगात आहेत आणि वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आरोपी आहेत. पीटीआय नेत्यांवर 9 मे रोजी झालेल्या दंगलीचाही आरोप आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य करण्यात आले होते.

लाहोरचा अर्ज फेटाळल्यावर इम्रान खान यांनी त्यांची जन्मभूमी मियानवली येथून निवडणूक लढवण्यासाठी दुसरा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता तोही फेटाळण्यात आला होता. खुद्द त्यांच्या मीडिया टीमने ही माहिती दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज