संभाजी भिडेंना अटक करा अन्यथा मर्डर करेन, सुबोध सावजींची खुलेआम धमकी…

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे(Sambhaji Bhide) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं समोर आलं आहे. माजी राज्यमंत्री सुबोध सावजी(Subodh Sawaji) यांनी संभाजी भिडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. दरम्यान, “भिडेंना अटक करा अन्यथा मी त्यांचा मर्डर करणार” अशी धमकी सावजी यांनी दिली आहे. यासंदर्भात सावजी यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांना निवेदन दिलं आहे. नितीन […]

Sambhaji Bhide

Sambhaji Bhide

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे(Sambhaji Bhide) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं समोर आलं आहे. माजी राज्यमंत्री सुबोध सावजी(Subodh Sawaji) यांनी संभाजी भिडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. दरम्यान, “भिडेंना अटक करा अन्यथा मी त्यांचा मर्डर करणार” अशी धमकी सावजी यांनी दिली आहे. यासंदर्भात सावजी यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांना निवेदन दिलं आहे.

नितीन देसाई यांची एक्झिट मनाला चटका लावणारी ; राजकीय नेत्यांकडून हळहळ !

संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन वादंग पेटलं आहे. राज्यात ठिकठिकाणी भिडेंविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांचा राज्यभर दौरा सुरु आहे. या दौऱ्यात विविध कार्यक्रमांना संभाजी भिडे हजेरी लावून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत आहेत. अमरावतीतल्या एका कार्यक्रमातही ते मार्गदर्शन करीत होते. त्याचवेळी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे.

संभाजी भिडेंना वक्तव्य भोवलं! आठ दिवसांत पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश…

भिडेंनी गांधींबद्दल केलेल्या विधानानंतर विरोधकांसह सामाजिक संघटनांकडून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. तर दुसरीकडे संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी सातत्याने विरोधकांकडून केली जात आहे. त्यानंतर आता सुबोध सावजी यांनी भिडेंना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. एवढंच नाहीतर जर आपण भिडेंवर कारवाई केली नाही तर याची जबाबदारी आपली राहील, असा इशारा सावजी यांनी फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात दिला आहे.

Exit mobile version