Download App

‘गोपीचंद पडळकर एक तमासगीर’.. चिडलेल्या सावंतांची पडळकरांवर आगपाखड

नागपूर : विरोधी पक्षांवर सडकून टीका करत सरकारची बाजू सांभाळणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकरांवर (Gopichand Padalkar) ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी हल्लाबोल केला आहे. गोपीचंद पडळकर हे एक तमासगीर आहेत, अशी जहरी टीका सावंत यांनी केली. आजपासून एसटी कर्मचारी आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत.

महाविकास आघाडीचे सरकार (MVA) असतानाही कामगारांनी आंदोलन केले होते. त्या आंदोलनात पडळकर आघाडीवर होते. आता तर त्यांचेच सरकार असतानाही कमर्चाऱ्यांना आंदोलन करावे लागत आहे, यावर पडळकर का बोलत नाहीत, असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला.

वाचा : अहमदनगरचे अहिल्यानगर होणारच, पडळकरांनी ठणकावले !

ते पुढे म्हणाले, की दिवाकर रावते परिवहन मंत्री होते. त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात चांगले काम झाले. या काळात त्यांनी विविध योजना सुरू करून एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला. एसटीत महिला कंडक्टर नियुक्त करण्याचे कामही आमच्या सरकारच्या काळात केले, असेही सावंत म्हणाले. दिवाकर रावते व त्यानंतर अनिल परब यांच्यासारखे काम कुणीच केले नाही,असा दावा सावंत यांनी केला.

Gopichand Padalkar : यावर मंत्रीच गौडबंगाल करत आहेत पडळकरांचा सरकारला घरचा आहेर

महाविकास आघाडी सरकारच्या काळात जे आंदोलन झाले. त्यावेळी कर्मचाऱ्यांना पगारात वाढ देण्यात आली होती. तरी देखील भाजप आमदार पडळकर यांनी आझाद मैदानावर आंदोलन केले होते. ते एक तमासगीर आहेत, लाज वाटली पाहिजे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा तमाशा केला त्यांनी. टाळ काय वाजवताय ? बोलतायत काय ? तेव्हा मागणी केली होती की महामंडळ शासनात विलीन करा. अशीच आहे त्यांची मागणी. आता ते का गप्प आहेत ? कारण, पगार देता येत नाहीत असा टोला सावंत यांनी लगावला. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,की 16 आमदार कायद्याने अपात्र व्हायला हवेत, असे त्यांनी सांगितले.

Tags

follow us