Download App

मुख्यमंत्री शिंदेंसह 16 आमदार होणार अपात्र? असीम सरोदेंनी व्यक्त केल्या चार शक्यता

Supreme Court On Eknath Shinde Vs Uddhav Thackeray :  राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता येत्या तीन ते चार दिवसांमध्ये हा निकाल लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा काही दिवस आधीपासूनच सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरु आहे. यामध्ये शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचेदेखील नाव आहे. त्यामुळे या खटल्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

येत्या 16 तारखेला न्यायमूर्ती शाह निवृत्त होणार आहेत. शाह यांनीदेखील या खटल्यामध्ये न्यायमूर्ती म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीच्या आधी हा निकाल लागण्याची शक्यता आहे. 13 मे रोजी कर्नाटक राज्याच्या विधानसभेचा निकाल लागणार आहे. त्याअगोदरच हा निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर आता वकील असीम सरोदे यांनी निकालाबाबत 4 शक्यता वर्तवल्या जात आहे.

Khargone Bus Accident : मध्यप्रदेशात मोठा अपघात; 50 फूट नदीत बस कोसळली, 15 जणांचा मृत्यू

महाराष्ट्र सत्तासंघर्ष  प्रकरणी निकाल 11 किंवा 12 मे 2023 ला लागेल. निकाल काय असेल याबाबत केवळ काही कायदेशीर शक्यता व्यक्त करता येऊ शकतात. 1.आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवणे ही एक मोठी शक्यता सोप्या निर्णयाचा भाग म्हणून जास्त आहे, असे त्यांनी आपल्या पहिला शक्यतेमध्ये म्हटलं आहे.

2. गव्हर्नर भगत कोशियारी यांनी जो आदेश काढून फ्लूअर टेस्ट घ्या, विधानसभेत बहुमत सिद्ध करा असा आदेश काढला तो काढण्याचा त्यांना अधिकारच नव्हता. राज्यपालांनी बहुमतचाचणीचा दिलेला आदेश रद्द ठरवला जाऊ शकतो.

शक्यता 3. पक्षविरोधी कारवाया केल्या असे म्हणून 16 आमदारांना थेट स्वतःच अपात्र ठरविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घटनेतील कलम 142 चा वापर करून घेईल कारण बहुमत चाचणी आदेश ही राज्यपालांची कृतीच घटनाबाह्य असल्याने ती रद्द करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहेत.

शक्यता 4. एक धूसर व कदाचित अस्पष्ट शक्यता आहे की हे प्रकरण मोठ्या संविधानिक गुंतागुंतीचे आहे व त्यामुळे 10 व्या परिशिष्टा संदर्भात आधी झालेल्या निर्णयांचा संदर्भ घेऊन हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवले जाऊ शकते. ही शक्यता धूसर आहे व तसे होणार नाही असे वाटते.

 

Tags

follow us