Ashish Shelar On Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray group)कोकणातील (Konkan)आयोजित कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यावरुन आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे. यावेळी आशिष शेलार म्हणाले की, ज्या पद्धतीचं भाषण माजी मुख्यमंत्र्यांनी कोकणात केलं आहे, त्यांना माझा प्रश्न आहे की, कार्यक्षम मुख्यमंत्री, गृहमंत्र्याची तुमची व्याख्या काय आहे? असा थेट सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.
Pune : “ए घायवळ… ए मारणे… तुला समजलं का?” : नवीन आयुक्तांचा पुण्यातील गुंडांना जाहीर दम!
यावेळी आमदार आशिष शेलार म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमच्या काळात दाऊदची प्रॉपर्टी विकणाऱ्या लोकांचं संरक्षण केलं जायचं. हे कार्यक्षम मुख्यमंत्री असण्याचं लक्षण आहे का? असा थेट सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
उद्धवजी तुमच्या काळामध्ये पोलीसच पोलिसांच्या मागे लागत होते, पाठलाग करत होते, हे कार्यक्षम असण्याची व्याख्या आहे का? तुमच्या काळामध्ये वसुली करण्याची सुपारी गृहमंत्र्यांकडून पोलिसांना दिली जायची, हे कार्यक्षम मंत्री असण्याचं लक्षण आहे का?
तुमच्या काळामध्ये स्फोटकं व्यावसायिकांच्या घराखाली पोलिसांच्या माध्यमातूनच लावली जाण्याचे आरोप होत होते. हेच कार्यक्षम गृहमंत्रिपद आहे का? निष्पाप माणसांचे बळी घेतले जात होते, हे कार्यक्षम मंत्री आणि गृहमंत्र्यांचे लक्षण होतं का?
पालघरमध्ये आमच्या साधुंना ठेचून मारण्याचा प्रयत्न झाला, हेच कार्यक्षम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं लक्षण आहे का? त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणि कार्यक्षम गृहमंत्री या विषयावर बोलताना आपल्या अगोदर विचार करुन बोलावं, असा सल्लावजा इशाराही आशिष शेलार यांनी यावेळी दिला.