Amit Shah : नवे फौजदारी कायदे ते हिट अँड रनची प्रकरणं; इंग्रजी पाऊलखुणा मिटवण्याचं अमित शाह यांचं लक्ष्य

Amit Shah : नवे फौजदारी कायदे ते हिट अँड रनची प्रकरणं; इंग्रजी पाऊलखुणा मिटवण्याचं अमित शाह यांचं लक्ष्य

Amit Shah : केंद्रातील मोदी सरकारमधील गृहमंत्री अमित शाह (Amit Shah ) म्हणजे निर्भीड आणि धडाडीचे निर्णय घेणारे मंत्री अशीच त्यांची ओळख सर्व परिचित आहे. त्यामुळेच अमित शाह ज्या आत्मविश्वासाने निर्णय घेतात. तशी त्याची अंमलबजावणी आणि विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सडतोड उत्तर देणे ही त्यांच्या कामाची पद्धत आहे. नुकतच अमित शाह यांची एका खाजगी वृत्तवाहिनीकडून मुलाखत घेण्यात आली. यावेळी शाह यांनी गृहमंत्री म्हणून नुकतेच आलेले तीन नवे फौजदारी कायदे, (new Criminal Laws ) तसेच 2017 पर्यंत भाजप सरकारला इंग्रजांच्या पाऊलखुणा कशाप्रकारे मिटवायच्या आहेत. या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती दिली. यावेळी अमित शहा नेमकं काय म्हणाले? पाहूया…

शेअर बाजारासाठी मंगळवार ठरला ‘शुभ’, गुंतवणुकदारांच्या संपत्तीत चार लाख कोटींची वाढ

यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर बोलताना शाह म्हणाले की, संसदेत मंजूर करण्यात आलेले तीन नवे फौजदारी कायदे, याकडे मी गेम चेंजरपेक्षा भारताच्या न्यायव्यवस्थेतील नव्या युगाची सुरुवात मानतो. कारण भारतावर दीडशे वर्ष इंग्रजांचे राज्य होतं तोपर्यंत त्यांच्या पद्धतीने कायदे असणं ठीक होतं. मात्र देश स्वातंत्र्य होऊ नये 75 वर्षे होऊन गेल्यावरही तेच कायदे ठेवणे म्हणजे इंग्रजांच्या सत्तेच्या पाऊलखुणा कायम ठेवण्यासारखं होतं.

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा? हिंदु-मुस्लिमांना एकसारखेच कायदे…

तसेच इंग्रजांनुसार कोणता गुन्हा सगळ्यात मोठा त्यानुसारच भारतीय कायदे आणि न्यायप्रक्रिया अवलंबून आहे. मात्र आताच्या काळामध्ये एका सभ्य समाजामध्ये कोणता गुन्हा सर्वात मोठा आहे? हे ठरवणे गरजेचे आहे. त्यानुसार मानव हत्या हा जरी सर्वात मोठा गुन्हा असला. तरी त्या अगोदर महिला आणि बालकांवरील अत्याचार हे देखील तेवढेच मोठे गुन्हे आहेत. त्यामुळे आता आलेले तीनही कायदे म्हणजे संविधानाच्या भावनेनुसार प्रत्येक व्यक्तीसाठी समान न्याय देणारे ठरणार आहेत.

Fighter Movie: दीपिका अन् हृतिक वादाच्या भोवऱ्यात; ‘या’ कारणामुळे मिळाली कायदेशीर नोटीस

तसेच आता आपण शिक्षा देण्यावर भर देण्यापेक्षा न्याय देण्यावर भर देणार आहोत. त्यासाठी आम्ही शिक्षेच्या जागी न्यायला स्थापित करणारे मूळ भारतीय विचारांचे जास्तीत सेंट्रिक काय तयार केले आहेत. या अगोदर आपण गुन्हेगारी कायदा लॅटिन आयरिश हे वापरत होतो. तसेच यावेळी शाह यांनी हिट अँड रन प्रकरणावर आलेल्या नव्या कायद्यावर देखील स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले की गेल्या काही दिवसांपूर्वी हिट अँड रनच्या नव्या कायद्याचे विरोधात ट्रक चालकांनी देशभर काढलेलं संपाचा हत्यार म्हणजे ते सगळं गैरसमज होता.

जनता वाऱ्यावर अन् गुंडांना राजश्रय, हेच का अच्छे दिन? विजय वडेट्टीवारांचा जळजळीत सवाल

कारण हिट अँड रन प्रकरणी संबंधित चालकाने जर पोलिसांना 108 नंबरवर माहिती दिली नाही. तो पळून गेला आणि नंतर कॅमेरामध्ये पकडला गेला. तर शिक्षा आणि दंड आहे अन्यथा नाही कारण आज 70 टक्के मृत्यू अपघातानंतर तात्काळ उपचार न मिळाल्याने होतात. तसेच या कायद्यावर अद्याप देखील आम्ही ट्रक चालकांशी चर्चा करणार आहोत. मला विश्वास आहे की आम्ही त्यांना समजावून सांगू शकतो.

त्याचबरोबर या मुलाखतीमध्ये अमित शहा यांनी ऑनलाइन पद्धतीने न्यायप्रक्रिया चालवणे, सायबर गुन्हेगारी, आर्थिक फसवणुकीचे गुन्हे, महिलांवरील अत्याचार, तसेच मॉब लिंचीग, दहशतवाद अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी सरकार एक सक्षम प्रणाली निर्माण करत करत आहे. तसेच पिढी त्यांना लवकरात लवकर न्याय देण्यासाठी देखील सरकार प्रयत्न करत असल्याचे यावेळी अमित शहा यांनी सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube