अंकशास्त्राचा गप्पा मारणारा ‘कॅप्टन’ गणितातच ‘ढ’ दहावीच्या रिझल्टनं काढली अशोक खरातची ‘कुंडली’

Ashok Kharat 10th Result अंकशास्त्राचा दावा करणाऱ्या 'कॅप्टन' खरातचे शैक्षणिक 'भविष्य' उघड; गणितातच होता नापास!

अंकशास्त्राचा गप्पा मारणारा 'कॅप्टन' गणितातच ढ; दहावीच्या रिझल्टनं काढली अशोक खरातची 'कुंडली'

अंकशास्त्राचा गप्पा मारणारा 'कॅप्टन' गणितातच ढ; दहावीच्या रिझल्टनं काढली अशोक खरातची 'कुंडली'

Ashok Kharat 10th Result Viral : १५४ देश फिरल्याच्या गप्पा मारणाऱ्या आणि स्वतःला भविष्याचा जाणकार म्हणवणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातची शैक्षणिक ‘कुंडली’ आता चव्हाट्यावर आली आहे. बाया-बापड्यांना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या या भोंदूचा मुखवटा आता पूर्णपणे उतरलाय. धक्कादायक बाब म्हणजे, जगाला अंकांच्या खेळावर भविष्य सांगणारा हा तथाकथित ज्योतिषी स्वतः दहावीच्या परीक्षेत गणिताचा पेपरही सोडवू शकला नव्हता. गणितात चक्क ‘फेल’ झालेल्या या भोंदूने सुशिक्षित समाजाला कसं गंडवलं, याचीच आता चर्चा रंगली आहे.

Ashok Kharat : अचाट शक्तिवर्धक अन् कामोत्तेजक; तुर्कितील एल्विश मध कसा तयार होतो?

‘लक्ष्मण’चा झाला ‘अशोक’ अन् गणितात पडले २८ मार्क

खरातचं मूळ नाव लक्ष्मण एकनाथ खरात. सिन्नर तालुक्यातल्या कहांडळवाडीचा (शिवाजीनगर) हा पोरगा. रोज ४ किलोमीटर पायपीट करून वावीच्या शाळेत जायचा. १९९५ मध्ये गॅझेट करून नाव ‘अशोक’ ठेवलं आणि मग सुरू झाला त्याचा भोंदूपणा. पण मार्च १९८३ च्या दहावीच्या परीक्षेत (नंबर C-52341) साहेबांनी काय दिवे लावलेत, ते आता समोर आलंय.

गणित: २८ मार्क (नापास)

समाजशास्त्र: ३८ मार्क (नापास)

मराठी: ३९ मार्क

इंग्रजी: ३७ मार्क

विज्ञान: ६२ मार्क

हिंदी: ४७ मार्क

एकूण टक्केवारी: ३५.८६% (निकाल: नापास)

हाय-टेक आर्मी ग्रेड मोबाईलमागचं काळं जाळं; अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

१५४ देश फिरल्याचा दावा अन् समाजशास्त्रात ‘भोपळा’

भल्याभल्या सुशिक्षितांना गंडा घालणारा हा भोंदू नेहमी सांगायचा की मी १५४ देश फिरलोय. पण गमतीची गोष्ट अशी की, ज्याला देशांच्या आणि समाजाच्या भूगोलाचा अभ्यास असतो, त्या ‘समाजशास्त्र’ विषयातही तो दहावीत नापास होता. २८ मार्क घेऊन गणितात फेल झालेला माणूस लोकांना अंकशास्त्राच्या गप्पा सांगून लुटत होता, याचं आता परिसरात मोठं नवल वाटतंय.

Video : खरातने महिलांना कसं फसवलं अन् काय केलं?, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत धक्कादायक माहिती

सुशिक्षित लोकही भुलले, आता सुरू झाली चर्चा

दहावी नापास असलेल्या या माणसानं फसवणुकीचे इतके मोठे इमले कसे काय बांधले? साधी दहावीची परीक्षा पास न होऊ शकणारा हा ‘कॅप्टन’ सुशिक्षित लोकांना कसा काय गंडवू शकला? याचीच आता गावोगावी चर्चा रंगली आहे. ‘दुसऱ्याची कुंडली पाहणाऱ्याची स्वतःचीच कुंडली आता पोलिसांनी बाहेर काढली’ असं लोक आता म्हणतायत.

Exit mobile version